शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

By admin | Updated: September 10, 2016 01:09 IST

कायदा बदलाची मागणी : मोर्चामध्ये पोलीस कुटुंबीयांसह निवृत्त पोलीस संघटनेचा समावेश

नाशिक : राज्यातील अंतर्गत कायदा व सुव्यवस्थेबरोबरच जनतेचे रक्षण करणाऱ्या कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब आहे़ विशेष म्हणजे दिवसेंदिवस या हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले असून या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी पोलीस कुटुंबीय, निवृत्त पोलीस कर्मचारी संघटना तसेच पोलीस बॉइज मित्रमंडळाने जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांकडे शुक्रवारी (दि़ ९) मूक मोर्चाद्वारे केली आहे़ पोलिसांवरील हल्ला हा कायद्यावरील हल्ला असून यामुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होते आहे़ तर दुसरीकडे समाजात कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांचे मात्र मनोधैर्य चांगलेच उंचावत चालले आहे़ सद्यस्थितीतील अस्तित्वात असलेला कायदा, अंमलबजावणीसाठी हतबल, असहाय व कुचकामी ठरत असून त्यामध्ये बदल होणे गरजेचे आहे़ सर्वसामान्यांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे़ पोलिसांवरील या वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस बॉइज संघटना,सेवानिवृत्त पोलीस कल्याण प्रतिष्ठान संघटना, निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या वतीने पोलीस मुख्यालयापासून शिस्तबद्ध पद्धतीने पोलीस मुख्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चामध्ये पोलीसपत्नी आपल्या लहान मुलांसह सहभागी झाली होते़ या मोर्चेकऱ्यांनी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी बी़ राधाकृष्ण, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांना मागण्यांचे निवेदन दिले़ या मूक मोर्चामध्ये निवृत्त पोलीस अधिकारी रावसाहेब पोटे, चंद्रकांत बनकर, मधुकर वसावे, रमेश पाटील, शांताराम महाजन, सुरेश महाजन, एस़ ई़ येवले, आनंदराव पठाडे, देवेंद्र शिंदे, रामराव देशमुख, गजमल पाटील, अशोक कळमकर, श्रावण सोनवणे यांच्यासह पोलीस कुटुंबीय, मोबीन सय्यद, संदीप चव्हाण, युवराज पांडे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते़