शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच उमेदवारांपुढे अंतर्गत राजकारणाचाच पेच

By admin | Updated: August 25, 2016 00:03 IST

जेलरोड : प्रभाग ३५, ३६ पोटनिवडणूक; प्रचारात भरला जातीपातीचा रंग

 नाशिकरोड : जेलरोड प्रभाग ३५ व ३६ च्या पोटनिवडणुकीत आगामी मनपा निवडणूक स्थानिक राजकारण, हितसंबंध आदि कारणांमुळे पक्षीय उमेदवारांना स्वपक्षातीलच कुरघोडीच्या राजकारणाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. ‘गुन्हेगारी’ हा प्रचारात कळीचा मुद्दा ठरला असला तरी जातीपातीचा रंग प्रचारात भरू लागला आहे.जेलरोड प्रभाग ३५ व ३६ ची पोटनिवडणूक होऊ नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे एकमत होते. पोटनिवडणुकीमुळे पक्ष व विशेष करून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याने जबाबदारी घ्यायला कोणाची तयारी दिसत नव्हती. मात्र नियमानुसार पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना, भाजपा, मनसे यांनी स्वतंत्रपणे कॉँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षाने आघाडी करत निवडणूक रिंगणात उतरले तर रिपाइं आठवले गटाने अद्यापपर्यंत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. आगामी मनपा निवडणुकीत प्रभाग चार सदस्यांचा होणार, प्रभाग रचना या पद्धतीने होईल, असे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुकांनी मनोमन पक्के केले आहे. या पोटनिवडणुकीत होणाऱ्या जय-पराजयामुळे आगामी मनपा निवडणुकीत कसा फायदा किंवा तोटा होऊ शकतो, अशी गणिते बांधण्यात आली आहे. तसेच पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एकमेकाला जशास तसे उत्तर देण्यासाठी राजकीय स्वार्थाची खेळी खेळत काहींना पक्षात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे वर्षानुवर्ष हातात पक्षाचा झेंडा घेऊन गल्लोगल्ली फिरणारे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या सर्व शह-काटशहच्या राजकारणामुळे पक्षीय उमेदवारांना स्वपक्षातील पाडापाडीच्या राजकारणाला सामोरे जाण्याची वेळ आल्याचे चित्र दिसत आहे. घरभेदीच्या भीतीमुळे स्वतंत्र प्रचार यंत्रणादेखील अमलात आणली आहे. शिवसेना व भाजपामध्ये याचा जास्त धसका घेतल्याचे दिसत आहे. तर मनसेमध्ये जे काही चालले आहे ते ठीक आहे, अशी परिस्थिती आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांची आघाडी ही नावापुरती झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग ३५ मध्ये राष्ट्रवादीला व प्रभाग ३६ मध्ये कॉँग्रेसच्या चिन्हावर लढणाऱ्या पीपल्स रिपाइंला स्वत:च्या हिमतीवर प्रचाराचा खेळ खेळावा लागत आहे. राष्ट्रवादीचे हातावर मोजण्याइतके पदाधिकारी प्रचारात सहभागी झाले आहेत. तर प्रभाग ३६ मध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादी असून नसल्यासारखी आहे.पोटनिवडणुकीच्या मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक असून उमेदवार व कार्यकर्त्यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. काही उमेदवारांच्या मतदानाच्या स्लिपा वाटण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. चारही पक्षांनी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली असली तरी प्रचारासाठी व शेवटच्या शक्तिप्रदर्शनासाठी ‘पेड’ कार्यकर्ते आणले जात आहे किंवा आणावे लागणार आहे. शिवसेना, भाजपा, मनसे यांच्या प्रचार कार्यालयात सतत कार्यकर्त्यांची गर्दी दिसत आहे. मात्र नाशिकरोडच्या भागातील या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गर्दीचा कितपत फायदा होईल, हे निकालानंतर स्पष्ट होईलच. साम, दाम, दंड, भेद अशा सर्व निकषांवर लढविल्या जात असलेल्या या निवडणुकीत अनेकजण आपल्या राजकीय भविष्याचे गणित आखून मार्गक्रमण करत आहे. (प्रतिनिधी)