शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

अखेरच्या श्वासापर्यंत निभावली मैत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:55 IST

नाशिक : वाड्याच्या मागील बाजूने असलेल्या भींतीची माती ढासळू लागल्याचे काळे कुटुंबियांच्या लक्षात आले. यामुळे संसारपयोगी साहित्य सुरक्षित रित्या हलविण्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी समर्थ काळे याचा मित्र करण याने त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी धाव घेतली, मात्र त्या दोघा मित्रांवर मैत्रीदिनीच काळाने झडप घातली. यामुळे संपुर्ण जुने नाशिक हळहळला.

ठळक मुद्देमैत्रीदिनीच मित्रांवर काळाची झडप : जुन्या नाशकातील वाडा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यूने सुन्न झाला परिसर

नाशिक : वाड्याच्या मागील बाजूने असलेल्या भींतीची माती ढासळू लागल्याचे काळे कुटुंबियांच्या लक्षात आले. यामुळे संसारपयोगी साहित्य सुरक्षित रित्या हलविण्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी समर्थ काळे याचा मित्र करण याने त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी धाव घेतली, मात्र त्या दोघा मित्रांवर मैत्रीदिनीच काळाने झडप घातली. यामुळे संपुर्ण जुने नाशिक हळहळला.संसारोपयोगी वस्तू हलविण्यासाठी मदत करत असताना वाडा कोसळला आणि दोघेही ढिगाऱ्याखाली दाबले गेले. ते अत्यवस्थ अवस्थेत ढिगाºयाखाली एकमेकांच्या शेजारीच होते. करणने समर्थसोबत केलेली मैत्री अखेरपर्यंत निभावली अशी चर्चा परिसरातील रहिवाशांमध्ये सुरू होती. दोघांनी या जगातून एकाचवेळी दुर्दैवी निरोप घेतल्याने अवघ्या जुन्या नाशकात हळहळ व्यक्त होत आहे. हे दोघेही राजे छत्रपती कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते होते. सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यामध्ये नेहमी दोघेही अग्रेसर असायचे, असे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. करण हा मंडळाच्या सेक्रेटरी पदावर होता. जुनी तांबट गल्ली, तिवंधा चौक, म्हसरूळटेक परिसराने करण, समर्थच्या रूपाने दोन चांगल्या युवा सामाजिक कार्यकर्त्यांना गमावले आहे. करणच्या मृतदेहावर शोकाकू ल वातावरणात अमरधाममध्ये रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेने अवघे जुने नाशिककर सुन्न झाले होते. बचावकार्य सुरू असताना बहुतांश रहिवाशांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या होत्या. काळाने अशा प्रकार दुर्दैवी झडप घातल्याने दोघा मित्रांना आपले प्राण मैत्रीदिनाला गमवावे लागल्याची शोकमग्नभावना व्यक्त झाल्या.