शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

स्वाइन फ्लूचे मिळणार मोफत डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 1:07 AM

शहरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून, सात महिन्यात शहरात दहा, तर जिल्ह्यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाल्याने शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शासनाच्या साथ रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली,

ठळक मुद्देशासनाचा प्रस्ताव : वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा; महापौरांकडून झाडाझडती

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असून, सात महिन्यात शहरात दहा, तर जिल्ह्यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाल्याने शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शासनाच्या साथ रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली, तर दुसरीकडे महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य यंत्रणेची बैठक घेऊन झाडाझडती घेतली. स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी तातडीने उपाय योजनांचा आराखडा करावा आणि प्रत्यक्ष कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे आदेश महापौरांनी दिले आहेत. तर राज्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ६५ हजार लसीची खरेदी करण्यात येणार असून, नाशिकमध्येही मोफत लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.शहरात गेल्या वर्षी स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव नव्हता. मात्र यंदा जानेवारी महिन्यापासूनच रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. जुलैपर्यंत दीडशे जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, शहरातच दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर साथ रोग नियंत्रण विभागाच्या सहायक संचालक दर्जाच्या अधिकाºयांनी प्रशिक्षण दिले. यावेळी आरोग्य सहसंचालक प्रकाश भोई तसेच नाशिकच्या आरोग्य उपसंचालक रत्ना रावखंडे, राज्य कीटक शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप, साथरोग अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्यासहअन्य मान्यवरांनी शासकीय वैद्यकीय अधिकारी तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेच्या पदाधिकाºयांना आयएमए सभागृहात मार्गदर्शन केले. स्वाइन फ्लू प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून, खासगी व्यावसायिकांनी उत्पादक कंपन्यांशी चर्चा करून माफक दरात लस उपलब्ध करून द्यावी, असे अधिकाºयांनी सांगितले. स्वाइन फ्लूसंदर्भातील औषधे खासगी वैद्यकीय व्यावसायिक प्रिस्क्रिप्शनद्वारे रुग्णांना देऊ शकतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे कोणत्याही प्रतिबंधाशिवाय रुग्णांना उपचार मिळू शकेल.दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य व वैद्यकीय विभागाची झाडाझडती घेतली. महापालिकेचे अधिकारी प्रभागात फिरत नाही, आरोग्य तपासणी करीत नाही, घरभेटीचे प्रमाण हे दिसते त्यापेक्षा कमी असावेत अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच प्रशासनावर विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील यांनी टीका केली. रस्त्यात झाडे झुडपे पडून आहेत. कचरा उचलला जात नाही. ब्लॅक स्पॉट ‘जैसे थे’ आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाचे प्रमुखपदाबाबत खो-खो सुरू आहे. कोणतेही अधिकारी प्रत्यक्ष प्रभागात फिरून परिस्थती तपासत नाही यावरून महापौरांसह अन्य गटनेत्यांनी प्रशासनातील अधिकाºयांना धारेवर धरले.एक महिन्यात एक लाख घरभेटी अशक्यचमहापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभाग तसेच शासनाच्या आरोग्य विभागाच्या ३०० कर्मचाºयांनी गेल्या महिन्यात १ लाख पाच हजार घरांना भेट देण्यात आल्या. त्यातील ५५९ घरांमध्ये डासअळ्या आढळून आल्या. एक हजार ५५० पाण्याचे साठे तपासण्यात आले. त्यातील ६२० ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळले. त्यात १५३ ठिकाणी महापालिकेने औषध टाकून उत्पत्ती स्थाने नष्ट केली, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी दिली. मात्र, नगरसेवकांनी त्यावर शंका उपस्थित केली. अजय बोरस्ते यांनी, तर एका महिन्यात एक लाख घरांना भेटण्याचा प्रकार अजब असून संबंधितांचा महापलिकेने सत्कार करावा, असे आवाहन केले.स्वाइन फ्लूचे जानेवारीपासून जुलैपर्यंत १५० रुग्ण आढळले आहेत. यात जानेवारीत ७, फेब्रुवारीत ४२, मार्च ५०, एप्रिल ३७, मे ११ तर जूनमध्ये ३ आणि जुलैत १ रुग्ण आढळला आहे आणि दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यSwine Flueस्वाईन फ्लू