शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

चतुर्थश्रेणीतील कर्मचारी करतात लिपिकांची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 1:06 AM

महापालिकेच्या नाशिक शहरातील सहा विभागीय कार्यालयांपैकी सर्वाधिक महसूल वसूल केला जात असलेल्या मनपाच्या सिडकोच्या विभागीय कार्यालयातील चतुर्थश्रेणी म्हणून शिपाई पदावर तसेच आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या बहुतांशी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून लिपिक म्हणून कामकाज करण्याचे काम आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देमहापालिका सिडको विभागीय कार्यालयाचा अजब कारभार

नरेंद्र दंडगव्हाळ । लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : महापालिकेच्या नाशिक शहरातील सहा विभागीय कार्यालयांपैकी सर्वाधिक महसूल वसूल केला जात असलेल्या मनपाच्या सिडकोच्या विभागीय कार्यालयातील चतुर्थश्रेणी म्हणून शिपाई पदावर तसेच आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या बहुतांशी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून लिपिक म्हणून कामकाज करण्याचे काम आल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.संबंधित कर्मचारी हे त्यांच्या मर्जीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लागेबांध असल्यानेच हा प्रकार उघडकीस येत नसला तरी यामुळे नागरिकांच्या महत्त्वाच्या नोंदी तसेच महत्त्वाचा दस्ताऐवजाचे कामकाज चतुर्थश्रेणी कर्मचारी सांभाळत असून, यात काही चूकझाल्यास कोण जबाबदार? असा प्रश्न यानिमित्ताने सिडकोवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.अंबड पोलीस स्टेशनसमोर महापालिकेचे विभागीय कार्यालय आहे. याठिकाणी सिडको तसेच अंबड भागांतील नागरिक त्यांच्या घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर कर भरण्यासाठी येतात. मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी म्हणून सोमनाथ वाडेकर हे कामकाज पाहत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांनी सर्व विभागीय कार्यालयातील विभागीय अधिकाºयांना सूचना देत संबंधित कर्मचाºयांची ज्या विभागात नेमणूक आहे त्याच विभागात काम करण्याबाबत आदेशित केले आहे. परंतु असे असतानाही विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांनी आयुक्तांचा आदेश धुडकावीत काही चतुर्थश्रेणी कर्मचारी हे लिपिकाचे कामकाज करीत असल्याचे दिसून येत आहे.महापालिकेचा प्रशासन, एक खिडकी योजना, जन्म-मुत्यू नोंदणी विभाग, आरोग्य, घरपट्टी, पाणीपुरवठा, विविध कर, उद्यान, बांधकाम, विद्युत आदी विभाग मिळून ४५३ अधिकारी व कर्मचारी काम करीत आहे. परंतु लिपिकांची संख्या कमी असल्याने बहुतांशी विभागात चतुर्थश्रेणी कर्मचारी व आरोग्य विभागात साफसफाई कामकाज करणारे हे लिपिक म्हणून काम करीत आहे.महापालिकेच्या जन्म-मुत्यू नोंदणी विभागातही महत्त्वाच्या नोंदी घेण्यासाठी लिपिकांऐवजी चतुर्थश्रेणी कर्मचारी कामकाज करीत आहे. या विभागात एकदा झालेली नोंदमध्ये बदल करता येत नसून अशा विभागांत तसेच आरोग्य विभागात सफाई कर्मचारी असलेले कर्मचारीदेखील लिपिक म्हणून काम करीत आहे. याबाबत विभागीय अधिकाºयांना माहिती असतानाही त्याकडे डोळेझाक करीत असल्यान याबाबत मनपा आयुक्तांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.आधीच मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी अनेकदा कामावर वेळेवर हजर राहत नसल्याचे याआधी उघड झालेले आहे. मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयातील बेजबाबदार अधिकाºयांमुळे कामकाज करणाºया नागरिकांनादेखील त्यांच्या कामासाठी ताटकळत रहावे लागते. कामकाज करणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर विभागीय अधिकारी यांचा धाक नसून सफाई कर्मचारी जर लिपिकाचे काम करीत असेल तर याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.या चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना महत्त्वाची कागदपत्रं हाताळणे, नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेणे, बिल तयार करणे आदी महत्त्वाची कामे दिली जात असले तरी यात काही चूक झाल्यास कोण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारी