शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
3
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
4
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
5
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
6
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
7
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
9
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
10
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
11
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
12
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
13
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
14
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
15
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
16
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
17
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
18
मोठी घडामोड! होर्मुज मार्ग खुला करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
19
टिंडरवर मैत्री, भेटायला बोलावलं; जेवताना ती म्हणाली बाथरूममध्ये जा, बाहेर येताच तरुणाचा खेळ खल्लास!
20
हे भगवान! ५०१ रुपयांचं 'यंत्र' विकत घेतलं, १० वर्षं देवघरात पूजा केली; Reel पाहून उघडलं तेव्हा धक्काच बसला!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकवर चारचाकी आदळून नातवंडासह मायलेक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:12 IST

या अपघातात नीता शहा (४४), संजना शहा (२८) आणि विद्या थोरात (६५) असे तिघे ठार तर सागर उत्तमचंद शहा (५८) व सावत शहा (३०) असे दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे

ठळक मुद्देआडगावची घटना : मृतात पुण्यातील दोघांचा समावेशमृत झालेले दोघी पुणे तर एक महिला नाशिकची

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : आडगाव शिवारातील शेर-ए-पंजाब ढाब्या समोर असलेल्या रस्त्यावर समोर जाणाऱ्या अज्ञात ट्रकचालकाने ब्रेक लावून रस्त्यात गाडी थांबवल्यामुळे पाठीमागून येणा-या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी मालट्रकवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघा मायलेकांचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत. मृत झालेले दोघी पुणे तर एक महिला नाशिकची रहिवासी आहे. पुणे येथील शहा कुटुंबिय सोमवार (दि. २१) मालेगाव येथे साडूच्या मुलीचा लग्नसोहळा आटोपून नाशिकला परतताना रात्री एक वाजता हा अपघात घडला.

या अपघातात नीता शहा (४४), संजना शहा (२८) आणि विद्या थोरात (६५) असे तिघे ठार तर सागर उत्तमचंद शहा (५८) व सावत शहा (३०) असे दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पुणे जिल्ह्यातील एरडवणा येथील रहिवासी असलेले सागर शहा हे रविवारी पत्नी नीता, मुलगी संजना, मुलगा सावत व सासू विद्या थोरात यांच्यासमवेत करोला गाडीतून क्रमांक (एम एच १४ एक्स ६३०१) मालेगाव येथे राहणारे साडू संजय दुसाने यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला गेले होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर शहा कुटुंबीय पुन्हा नाशिकला येण्यासाठी निघाले. रात्री एक वाजेच्या सुमारास आडगाव शिवारातील शेर-ए-पंजाब ढाब्यासमोर असलेल्या महामार्गावरून शहा हे करेला चारचाकीतून येत असताना पुढे धावणा-या एका अज्ञात मालट्रक चालकाने ब्रेक मारला व मालट्रक अचानक पुढे थांबली त्यातच चालक शहा यांचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार ट्रक वर जाऊन पाठीमागून आदळली. या अपघातात शहा यांची पत्नी नीता शहा, मुलगी संजना शहा, सासु विद्या थोरात यांना गंभीर मार लागल्याने त्यांना तत्काळ उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली तर स्वत: शहा व मुलगा सावत असे दोघे जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी कारचा अक्षरश: चिंधडया झाल्या आहे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बिडकर तपास करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकPuneपुणे