शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

चार टक्के साठ्याने धाकधूक वाढली

By admin | Updated: June 10, 2016 00:04 IST

पावसाची प्रतीक्षा : टॅँकर अडीचशेच्या घरात

नाशिक : हवामान खात्याने वेळोवेळी मान्सून लवकर येण्याचा व्यक्त केलेला अंदाज खोटा ठरल्यामुळे जिल्ह्णातील धरणांमध्ये अवघा चार टक्के पाणी साठा शिल्लक असल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. पाऊस आणखी लांबला तर अगोदरच अडीचशेच्या घरात पोहोचलेल्या टॅँकरची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्णात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, जानेवारी महिन्यापासूनच काही तालुक्यांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानंतर नाशिक, कळवण वगळता अन्य तेरा तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली, मात्र याच दरम्यान नदी, नाले कोरडे पडून विहिरींनीही तळ गाठला, तर धरणांच्या साठ्यातही कमालीची कमतरता आली. मे महिन्यातच जेमतेत सात टक्के साठा असलेल्या धरणांमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात फक्त चार टक्केच साठा शिल्लक राहिला असून, त्यातच मान्सूनच्या आगमनाची चिन्हे नाहीत.यंदा मान्सूनचे आगमन लवकर व समाधानकारक होण्याचे भाकीत हवामान खात्याने फार पूर्वीपासूनच व्यक्त केल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाची दमदार हजेरी लागून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा बाळगून असलेले प्रशासन पावसाची चिन्हे दिसत नसल्याने चिंतेत सापडले आहे. पाऊस लांबला तर टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी कोठून उपलब्ध करायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. धरणांमधील पाण्याचे शेवटचे आवर्तन मे महिन्याच्या अखेरीस संपले असून, सध्याचा साठा पाहता गंगापूर धरण समूह वगळता अन्य समूहांमध्ये उरलेल्या साठ्यातून पिण्याची गरज भागण्याची शक्यता कमीच आहे.