जिल्हा न्यायालयातील चार नूतन न्यायालयांचे आज उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 01:00 IST2018-06-04T01:00:51+5:302018-06-04T01:00:51+5:30

नाशिक : शहर पोलीस मुख्यालयाकडून जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी देण्यात आलेल्या अडीच एकर जागेतील बॅरेकमध्ये चार वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयांच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे़ या नूतन चार न्यायालयांचा उद्घाटन समारंभ सोमवारी (दि़४) सकाळी दहा वाजता होणार आहे़

 Four new courts of the district court today inaugurated | जिल्हा न्यायालयातील चार नूतन न्यायालयांचे आज उद्घाटन

जिल्हा न्यायालयातील चार नूतन न्यायालयांचे आज उद्घाटन

नाशिक : शहर पोलीस मुख्यालयाकडून जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी देण्यात आलेल्या अडीच एकर जागेतील बॅरेकमध्ये चार वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयांच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे़ या नूतन चार न्यायालयांचा उद्घाटन समारंभ सोमवारी (दि़४) सकाळी दहा वाजता होणार आहे़

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे असून, अधीक्षक अभियंता हांडे यांची प्रमुख उपस्थिती आहे़ या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा न्यायालय प्रशासन व नाशिक बार असोसिएशन यांनी केले असून, या कार्यक्रमास वकिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ नितीन ठाकरे यांनी केले आहे़

Web Title:  Four new courts of the district court today inaugurated