शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘खंडवा’ला चार दिवसांची कोठडी

By admin | Updated: August 26, 2016 00:31 IST

‘खंडवा’ला चार दिवसांची कोठडी

नाशिक : महाविद्यालयीन युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक यांना विविध क्लृप्त्या लढवून रिक्षा किंवा दुचाकीवरून निर्जन ठिकाणी नेऊन त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या ‘खंडवा’ या सराईत गुन्हेगाराला न्यायालयाने येत्या सोमवार (दि.२९) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे दोन ते अडीच महिन्यांपासून जबरी लूट करणारा पंचवटीमधील सराईत गुन्हेगार नीलेश अशोक सोनवणे ऊर्फ खंडवा नाशिककरांमध्ये दहशत पसरवित होता. अनेकदा पोलिसांच्या नजरेत धूळफेक करून नीलेश सोनवणे पळून जाण्यात यशस्वी होत होता. खंडवा हा देवळाली, शिंदे, वणी या परिसरात वेशभूषा बदलून राहात होता. पंधरवड्यानंतर तो राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याला ताब्यात घेण्यास पोलिसांना अडचणी निर्माण होत होत्या. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील काही कर्मचाऱ्यांची निवड केली. गोपनीय माहितीच्या आधारे या पथकाने सापळा रचून खंडवा यास लासलगाव येथून अटक केली. त्याच्याकडून विविध गुन्ह्यांमध्ये वापरलेली एअर पिस्तूल, मोटारसायकल, चार मोबाइल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सरकारवाडा, पंचवटी आदि पोलीस ठाण्यांमध्ये सोनवणेविरुद्ध जबरी लूट, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला विविध गुन्ह्यांमध्ये साथ देणाऱ्या काही संशयितही पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्याही मुसक्या आवळण्याची तयारी सुरू केली आहे.