शहरातून चार दुचाकींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:15 IST2018-10-09T17:14:38+5:302018-10-09T17:15:42+5:30
नाशिक : शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी विविध ठिकाणाहून चार दुचाकी चोरून नेल्या आहेत़ याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

शहरातून चार दुचाकींची चोरी
नाशिक : शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी विविध ठिकाणाहून चार दुचाकी चोरून नेल्या आहेत़ याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंचवटीतील मधुबन कॉलनीतील रहिवासी दत्तात्रय शिंदे यांची दहा हजार रुपये किमतीची आरएक्स १०० दुचाकी (एमएच १५, आयई १८६०) चोरट्यांनी महालक्ष्मी टॉकिजशेजारील निरायम हॉस्पिटलच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गंगापूररोडवरील स्वामी समर्थ चौकातील प्रकाश मोरे यांची ५० हजार रुपये किमतीची युनिकॉर्न दुचाकी (एमएच १५, ईव्ही ६६४४) चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेली़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
इंदिरानगर पेठेनगर परिसरातील रोहन वराडे यांची ३५ हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी (एमएच १५, डीएफ ७३८५) चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेली़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
उपनगरच्या केंद्रीय विद्यालयाजवळील रहिवासी अशोक सोनवणे यांची यांची २५ हजार रुपये किमतीची डिस्कव्हर दुचाकी (एमएच १५, डीपी ३००५) चोरट्यांनी सुभाषरोडवरून चोरून नेली़ याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़