माजी मंत्री भुजबळांची हिरे यांनी घेतली भेट

By Admin | Updated: March 30, 2017 23:55 IST2017-03-30T23:55:14+5:302017-03-30T23:55:29+5:30

मालेगाव : गेल्या पंधरा वर्षांपासून माजी मंत्री छगन भुजबळ व प्रशांत हिरे यांच्या घराण्यातील वाद संपुष्टात आले आहेत.

Former minister Bhujbal's diamonds took place | माजी मंत्री भुजबळांची हिरे यांनी घेतली भेट

माजी मंत्री भुजबळांची हिरे यांनी घेतली भेट

 मालेगाव : गेल्या पंधरा वर्षांपासून माजी मंत्री छगन भुजबळ व प्रशांत हिरे यांच्या घराण्यातील वाद संपुष्टात आले आहेत. जिल्हा बँकेचे माजी चेअरमन अद्वय हिरे यांनी माजी मंत्री भुजबळ यांची मुंबई येथे भेट घेतल्यामुळे मैत्रीपूर्व संबंध प्रस्थापित झाल्याचे सिद्ध झाले आहे. नांदगाव व मालेगाव तालुक्याच्या राजकारणात याचे राजकीय पडसाद दिसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मालेगाव पंचायत समिती सभापती निवडणुकीच्या वेळेसच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजीमंत्री भुजबळ यांच्या सल्ल्यानुसार भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या सत्तेचा वारू रोखण्यासाठी भाजपाचे अद्वय हिरे यांनी माजीमंत्री छगन भुजबळ यांच्याशी जमवून घेतले. त्यानंतर पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिभा सूर्यवंशी यांची वर्णी लागली. शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यात भाजपाला यश आले. या यशातच भुजबळ व हिरेंची दिलजमाई झाल्याचे उघडकीस आले होते; मात्र अद्वय हिरे यांनी तब्बल ७ वर्षानंतर मुंबई येथील न्यायालयात भुजबळ यांची भेट घेऊन अर्धातास चर्चा केली.
गेल्या पंधरा वर्षापूर्वी कळवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेला माजी मंत्री भुजबळ उपस्थित राहू न शकल्यामुळे हिरे समर्थक नाराज झाले होते. तेव्हापासूनच भुजबळ व हिरे गटामध्ये वाद होत होते. या वादामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना
त्रास होत होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुना वाद मिटवून
एकत्र रणनीती आखण्याचे निर्णय भेटीत ठरल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हिरे व भुजबळांचे राजकीय पक्ष सध्या वेगवेगळे आहेत. भविष्यात सत्तेच्या राजकारणासाठी पक्षविरहीत मैत्रीपूर्ण संबंधातून एकत्र येऊ असे भेटीत ठरले असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Former minister Bhujbal's diamonds took place