पूर ओसरला; पावसाची काहीशी विश्रांती

By Admin | Updated: August 1, 2014 01:08 IST2014-08-01T00:50:06+5:302014-08-01T01:08:09+5:30

पूर ओसरला; पावसाची काहीशी विश्रांती

Floods out; Some rest of the rain | पूर ओसरला; पावसाची काहीशी विश्रांती

पूर ओसरला; पावसाची काहीशी विश्रांती

पंचवटी : गेल्या दोन दिवसांपासून दमदारपणे हजेरी लावणाऱ्या पावसाने काल सायंकाळपासून काहीशी विश्रांती घेतल्याने गोदावरी नदीला आलेल्या पुराचे पाणी ओसरले आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिकांचे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते.
काल सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्याने गोदावरीला नाले व नदीच्या पाण्यामुळे पूर आला होता. या पुरामुळे बुधवारचा आठवडे बाजार पूर्णपणे ठप्प झाला होता. दरम्यान, सायंकाळी पावसाने काहीशी उघडीप दिल्याने गोदावरीचा पूर ओसरला असून, गोदाघाटावरचे जनजीवन सुरळीत झाले आहे. आज पूर ओसरताच भाजीविक्रेत्यांनी पूर्वीच्याच जागी आपले व्यवसाय सुरू केले होते. (वार्ताहर)

Web Title: Floods out; Some rest of the rain