"मासा पाण्यातील वनस्पती, त्यांच्यात रक्त नाही"; अशोक खरातने शाकाहारी माणसांना खाऊ घातले 'मासे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:30 IST2026-04-01T13:28:29+5:302026-04-01T13:30:05+5:30

लोकांच्या श्रद्धेचा फायदा उचलत त्यांची फसवणूक आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. शाकाहारी असलेल्या लोकांना खरातने मांसाहार करायला दिला. 

"Fish is a water plant, it has no blood"; Ashok Kharat feeds 'fish' to vegetarians | "मासा पाण्यातील वनस्पती, त्यांच्यात रक्त नाही"; अशोक खरातने शाकाहारी माणसांना खाऊ घातले 'मासे'

"मासा पाण्यातील वनस्पती, त्यांच्यात रक्त नाही"; अशोक खरातने शाकाहारी माणसांना खाऊ घातले 'मासे'

अशोक खरात याने लोकांना कशा पद्धतीने फसवले, त्यांच्याकडून पैसे उकळले; महिलांवर अत्याचार केले, याच्या कहाण्या समोर येत आहेत. यात आता आणखी एका प्रतापाची भर पडली आहे. अशोक खरात याने शाकाहारी असलेल्या माणसांना मासे खाऊ घातले. मासा हा पाण्यातील वनस्पती आहे. तो कापल्यानंतर रक्त येत नाही, असे सांगत खरातने त्याच्याकडे येणाऱ्या शाकाहारी लोकांना मांसाहाराचाच प्रसाद दिला. 

लोकांच्या श्रद्धेचा फायदा उचलत अशोक खरात याने अनेक लोकांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यांना भीती घालून, त्यांना धमक्या देऊन पैसे उकळले, महिलांवर अत्याचार केल्याची प्रकरणे आता समोर आली आहेत. खरातने शाकाहारी लोकांना मांसाहार करायला लावल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. 

मासा हा पाण्यातील वनस्पती

अशोक खरात याने शाकाहारी लोकांना मासे खायला दिल्याचे तपासातून समोर आले. 'मासा हा पाण्यातील वनस्पती आहे. मासा कापल्यावर त्यातून रक्त येत नाही. त्यात हाडे नसतात', असे खरात सांगायचा आणि प्रसाद म्हणून मासे खायला देत होता. 

अशोक खरात हा प्रसाद किंवा तीर्थ म्हणून वेगवेगळ्या गोष्टी करत होता. तो लोकांना पाणी द्यायचा, मध द्यायचा, व्हायग्राच्या गोळ्यांचा समावेश असलेले पाणी किंवा पेढे खायला द्यायचा, असेही आतापर्यंतच्या तक्रारीतून समोर आले आहे. 

अशोक खरातकडे चार सीमकार्ड 

भोंदू अशोक खरात याची चौकशी केली गेली. त्याने काही गोष्टी पोलिसांना सांगितल्या आहेत. अशोक खरात हा चार सीमकार्ड वापरत असल्याचे तपासात आढळून आले आहे. यातील एक मोबाईल क्रमांक हा फक्त व्हिआयपी लोकांशी संपर्क करण्यासाठी वापरला जात होता. 

दुसरा मोबाईल क्रमांक मोजक्या अनुयायी आणि महिलांशी बोलण्यासाठी वापरला जात होता. तर तिसरा मोबाईल क्रमांक हा आर्थिक व्यवहारांशी संबंधित कामासाठी वापरला जात होता. चौथा क्रमांक इतर सगळ्या लोकांसाठी होता, असेही समोर आले आहे. 

Web Title : अशोक खरात ने शाकाहारियों को धोखा दिया, मछली को सब्जी बताकर परोसा।

Web Summary : अशोक खरात ने लोगों को धोखा दिया, पैसे वसूले और महिलाओं पर अत्याचार किया। उन्होंने शाकाहारियों को मछली खिलाई, यह दावा करते हुए कि यह बिना खून और हड्डियों वाली पानी की सब्जी है। खरात ने लोगों की आस्था का फायदा उठाया, वियाग्रा युक्त प्रसाद भी दिया। वह अलग-अलग समूहों के लिए चार सिम कार्ड इस्तेमाल करते थे।

Web Title : Ashok Kharat tricked vegetarians, served fish, claiming it's a vegetable.

Web Summary : Ashok Kharat deceived people, extorted money, and allegedly abused women. He tricked vegetarians into eating fish by claiming it was a water vegetable without blood or bones. Kharat exploited people's faith, offering various items, including Viagra-laced treats. He used four SIM cards for different groups.