शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधीत क्षेत्रात फवारणीस अग्निशमन विभागाचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 21:05 IST

मुळातच प्रतिबंधीत क्षेत्रात जंतु नाशकांची फवारणी हे अग्निशमन तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे काम नाही तर जंतु नाशक फवारणी हे वैद्यकिय आणि आरोग्य विभागाचे काम आहे.

ठळक मुद्देवाहने वैद्यकिय विभागाकडे वर्ग करण्याची मागणीनाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलात ८५ टक्के कर्मचारी

नाशिक : शहरात कोरोनाबाधीतांची संख्या वाढल्यानंतर प्रतिबंधीत क्षेत्र वाढत आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने प्रतिबंधीत क्षेत्रात सोडीयम हायपोक्लाराईडची फवारणी करण्याकरीता अग्निशमन दलाच्या वाहनांचा वापर केला जात आहे. मात्र, त्यासाठी वाहनावरील कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने जीवावर बेतण्याची शक्यता आहे. यामुळे प्रतिबंधीत क्षेत्रात फवारणी करण्यास अग्निशमन विभागाच्या वाहनांचा आणि जवानांचा वापर करू नये अशी मागणी नाशिक महापालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहेत.महापालिका प्रशासनाला फवारणी करायची असेल तर मिनी वॉटर मिस्ट प्रकारची पाच वाहने आरोग्य वैद्यकिय विभागाकडे वर्ग करून त्या विभागाकडे औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी देखील संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. शहरात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे एखाद्या क्षेत्रात बाधीत आढळल्यानंतर महापालिकेच्या वतीने सदरच्या रूग्णाच्या घराचा परीसर प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यानंतर वैद्यकिय विभागातील अधिकारी कर्मचारी अग्निशमन दलाशी संपर्क साधून बंबाच मागणी करतात. विशेषत: या कामासाठी मिनी वॉटर मिस्ट आणि क्यु.आर.व्ही. वाहने मागितली जातात. आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने नसल्याने एखाद्याला कोरोना संसर्ग झाल्यास संपुर्ण अग्निशमन दलच कोरंटाईन करावे लागेल असे निवेदनात म्हंटले आहे. मुळातच प्रतिबंधीत क्षेत्रात जंतु नाशकांची फवारणी हे अग्निशमन तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे काम नाही तर जंतु नाशक फवारणी हे वैद्यकिय आणि आरोग्य विभागाचे काम आहे. त्यातच मालेगावसह काही ठिकाणी अग्निशमन दल कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे.मालेगावी तर एकाचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे अग्निशमन कर्मचा-यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या व्यतिरीक्त अन्य कामे येऊ अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, जगदीश देशमुख, तानाजी जायभावे, वसुधा कराड, नाना गांगुर्डे, प्रमोद लहामगे, संतोष गांगूर्डे, संतोष आगलावे यांनी केली आहे. वयाची पन्नाशी पार केलेल्यांना आजाराचा धोका असल्याने मुख्यमंत्र्यांनी अशी वयोमर्यादा पार करणा-या पोलीसांना बंदोबस्तातून सुट दिली आहे. नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलात ८५ टक्के कर्मचारी हे वयाची पन्नाशी पार केलेले आहेत. त्यामुळे त्यांना संसर्गाची भीती अधिक असल्याचे संघटनेने निवेदनात नमुद केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दल