शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
3
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
4
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
5
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
6
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
7
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
8
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
9
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
10
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
11
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
12
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
13
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
14
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
15
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
16
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
17
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
18
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
19
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
20
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रांत, तहसीलदारांसह अधिकाऱ्यांच्या घरांची झडती

By admin | Updated: January 7, 2017 01:35 IST

प्रांत, तहसीलदारांसह अधिकाऱ्यांच्या घरांची झडती

 नाशिक : बेकायदेशीर फेरफार नोंदी व बनावट प्रतिज्ञापत्राच्या आधारे शासकीय जमिनीच्या गैरव्यवहारात सुमारे चार कोटींचा महसूल बुडविल्याचा आरोप असलेल्या उपविभागीय अधिकारी वासंती माळी, तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन यांच्यासह ११ लोकसेवकांच्या निवासस्थानांची शुक्रवारी लाचलुचपत विभागाने झाडाझडती घेतली.
दरम्यान, या गुन्ह्णाची व्याप्ती बघता जिल्ह्यातील वनजमिनी, गायरान यासह इतर सरकारी जमिनींच्या सर्व व्यवहारांची पडताळणी करण्यात येणार असून, त्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले यांनी दिली. नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीची परवानगी देण्याचा अधिकार नसताना नांदगावचे तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन यांनी जवळपास ३०० एकरच्या आसपास नवीन अविभाज्य शर्तीच्या जमीन खरेदी-विक्र ीस परवानगी दिली. यामुळे सरकारचा ५० टक्के महसूल बुडला. या बेकायदा कामात तहसीलदार महाजन यांच्या समवेत येवल्याच्या प्रांत वासंती माळी, तत्कालीन प्रभारी तहसीलदार प्रमिला दंडिले, दुय्यम निबंधक डी. डी. पंडित, मंडल अधिकारी अशोक शिलावट, एस. के.आहेर, अव्वल कारकून डी. ए. कस्तुरे (जमाबंदी), तलाठी व्ही. पी. सोनवणे, व्ही. बी. बोडके, जयेश मलदुडे, व्ही. पी. गायकवाड यांच्यासह अ‍ॅड. शिवाजी सानप, अ‍ॅड. प्रशांत सानप (कासारी), नाशिकचे जयंतीभाई पटेल, भावीन पटेल, मणिबेन पटेल, प्रवीणभाई पटेल, अर्जुन माकानी, शिवलाल माकानी, रंजन माकानी, विनोद माकानी, भारती शहा, पोपट पटेल यांचाही सहभाग असल्याने या प्रकरणी पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांनी नांदगाव पोलिसांत फिर्याद दिली. सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथील जयराम दळवी यांच्या तक्र ार अर्जाचा आधार घेत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या गुन्ह्णात अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही; मात्र संशयितांच्या घराची झडती प्रक्रि या पूर्ण करण्यात आली. (प्रतिनिधी)