शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोविडमुळे कोलमडले शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:15 IST

कवडदरा : खरीप हंगाम अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरू केली आहेत. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे यांची खरेदी करण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र, शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले दिसून येत आहेत.

ठळक मुद्दे खतांच्या किमतीत ३०० ते ५०० रुपयांपर्यंतची वाढ

कवडदरा : खरीप हंगाम अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे सुरू केली आहेत. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे यांची खरेदी करण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र, शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले दिसून येत आहेत.कोविडमुळे लॉकडाऊन आणि खतांवरील वाढत्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस, शेतीमालाचे झालेले नुकसान, लॉकडाऊनमुळे हाती आलेला शेतीमाल बेभावात विकावा लागल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. हीच परिस्थिती शेतकरी पुन्हा अनुभवत आहे. आताही कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला तसेच इतर फळे माल शेतातच सडला आहे.खरीप हंगाम अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, भरवीर बु., साकूर, पिंपळगाव, घोटी बु. परिसरात शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहे. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खत, बी-बियाणे याची खरेदी करण्यासाठीची सुरुवात केली आहे. मात्र, शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले दिसून येत आहेत.एकीकडे शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतीमालाला मिळणारा भाव पाहता यावर्षी रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी खतांच्या किमतीत ३०० ते ५०० रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे आधीच मोडकळीस निघालेली शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था खतांच्या दरवाढीमुळे पुरती कोलमडली आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांवरील अनुदान कमी केल्यामुळे ७ एप्रिलपासून खतांच्या किमतीत प्रतिबॅग ३०० ते ४०० रुपये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थचक्राला मोठा फटका बसणार आहे.- सचिन सहाणे, शेतकरी, साकूर.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी