शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सेंट फ्रान्सिस हायस्कूलचे प्राचार्य व विश्वस्त यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: July 27, 2014 01:55 IST

सेंट फ्रान्सिस हायस्कूलचे प्राचार्य व विश्वस्त यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

 

इंदिरानगर : शिक्षण मंडळाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून विद्यार्थी व पालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अडवणूक करून गतवर्षीच्या तुलनेत वीस टक्के फ ी वाढ करणारे चेतनानगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलचे प्राचार्य संजय पाटील व विश्वस्त आॅगस्टीन पिंटो यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात कॅपिटेशन अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ इंदिरानगर पोलीस ठाण्यात तुषार खंडू घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा विघ्नेश व सार्थक हे सेंट फ्र ान्सिस हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत़ खासगी व विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या या हायस्कूलमध्ये विद्यार्थ्याकडून टर्म फी, अ‍ॅडमिशन फी, ट्यूशन फी, अ‍ॅक्टिव्हिटी फी, कॉम्प्युटर फी, मंथली फी, मिसलीयन्स फी घेतली जाते़ त्यामधील ट्यूशन, अ‍ॅक्टिव्हिटी व लेट फ ी दर महिन्याला घेतली जाते़दरवर्षी शाळेकडून फीमध्ये वाढ केली जात असून, ती करताना विद्यार्थ्यांना अगर त्यांच्या पालकांना कोणत्याही प्रकारची तोंडी व लेखी पूर्वसूचना केली जात नाही़ २०१२ -२०१३ या शैक्षणिक वर्षात आकारलेल्या फीपेक्षा २०१३-२०१४ मध्ये अचानकपणे १८ टक्के, तर चालूवर्षी त्यामध्ये २० टक्के वाढ करण्यात आली आहे़ याविरोधात प्राचार्य संजय पाटील व विश्वस्त आॅगस्टीन पिंटो यांची विनायक सोनवणे, अरुण खांडबहाले, योगेश जाधव, अशोक चुंबळे, भाऊसाहेब बोराडे, कविता जगताप, इंदू विश्वकर्मा, ज्योत्स्ना संगम, प्रतिभा हांडे व पालकांनी विचारणा केली, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही़शाळेच्या या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कैफियत मांडली़ शिक्षण मंडळाने शाळेला पत्र लिहून बेकायदेशीरपणे केलेली फ ी वाढ रद्द करण्याचे आदेश दिले; मात्र शाळेने या आदेशास केराची टोपली दाखविली़ विद्यार्थ्यांकडून वाढीव फी वसुली सुरूच असून, विद्यार्थ्यांच्या डायरीमध्ये सूचना लिहून देण्यात आल्या आहेत़ तसेच फी न भरल्यास परीक्षेला बसू न देणे, तसेच निकाल दाखविण्यात येणार नसल्याचेही नमूद करण्यात येत असून, लेट फी आकारली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे़शाळेचे प्राचार्य व विश्वस्तांच्या या मनमानी कारभाराविरोधात तुषार घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिसांनी कॅपिटेशन अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे़ (वार्ताहर)