पीएचडी प्राप्त महिलांचा सत्कार

By Admin | Updated: January 4, 2017 00:33 IST2017-01-04T00:33:33+5:302017-01-04T00:33:49+5:30

पीएचडी प्राप्त महिलांचा सत्कार

Felicitated women who received Ph.D. | पीएचडी प्राप्त महिलांचा सत्कार

पीएचडी प्राप्त महिलांचा सत्कार

नाशिक : ईश्वर नागरी सहकारी पतसंस्था व मीरा दया सोशल अ‍ॅँड एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व महिला मुक्तीदिनानिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैराज कलादालन येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. आशा वेरुळकर, डॉ. अरुणा जोशी, आमदार देवयानी फरांदे, वर्षा काकडे, अनिल जाधव, योगीता अहेर, उद्योजिका नीलिमा पाटील, भाजपाच्या रोहिणी नायडू, डॉ. प्रतिभा सोनवणे - पगारे, भारती धात्रक, दिनेश जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी निरनिराळ्या विषयावर पीएचडी केलेल्या २३ महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या सत्काराने कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी डॉ. आशा वेरुळकर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. पुरस्कार प्राप्त सखींनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी झालेल्या या सत्काराबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभी दुपारी २ ते ६ या वेळेत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास सन्मानार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Felicitated women who received Ph.D.