शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाची पिके वाया जाण्याची भीती

By admin | Updated: September 6, 2016 22:04 IST

पावसाची दडी : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील बळीराजा हवालदिल; जनावरांच्या चाऱ्यासाठीही कसरत

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील वटार परिसरात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके वाया जाण्याची चिन्हे दिसत आहेत. सुरुवातीला चांगल्या प्रकारे पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.खरिपातील मका, बाजरी ही पिके अत्यंत केविलवाणी अवस्थेत आहेत. सुरुवातीला चांगला पाऊस जरी झाला तरी आता पिके उम्रावर आहेत. पावसामुळे पिकांची वाढही खुंटली आहे. उत्पादनात पन्नास टक्क्यांची घट तर होणार आहेच; परंतु चार ते पाच दिवसात पुरेसा पाऊस झाला नाहीतर फक्त जनावरांसाठी चारा गोळा करावा लागणार आहे.आठ दिवसांपासून तपमानात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन उष्णतेचे प्रमाण वाढल्याने पावसाळा की उन्हाळा, असा प्रश्न पडला आहे.पाण्यासाठी मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. जंगलात जनावरांना चारा नाही, पाणी नाही स्थलांतर करण्याची वेळ आली आहे; पण स्थलांतर करून जायचं कुठं कारण कोठेच पाणी नाही. मेंढपाळ करणारे दुहेरीत संकटात सापडले असून, चाऱ्यासाठी वणवण भटकंती करूनही चारा व पाणी मिळत नाही.मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी बऱ्यापैकी सुरुवातीला पाऊस पडला; पण सर्व पाणी वाहून गेल्याने जमिनीत पाणी जिरलेच नाही त्यामुळे विहिरींनीही तळ गाठला. एकेकाळी पाण्यासाठी प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या वटार परिसरात पिण्याच्याही पाण्याची भ्रांत पडली आहे. भरवशाचे पीक समजले जाणारे कांदा पिकाला बाजार नसल्याने चाळीतच कांदा सडला आहे. थोड्याफार प्रमाणात शिल्लक राहिलेला कांदा मातीमोल भावात बळीराजाला विकावा लागत आहे. परिणामी गरीब शेतकरी अधिकच गरीब होत राहील.परिसरातील शेती व शेतकरी धोक्यात आला असून, शेतकरी व शेतमजुराला काम नाही. दोघांवरही उपासमारीची वेळ आली आहे. पावसाळी कांदा लागवड करणारा शेतकरी पाणी नसल्याने शांत बसला आहे. काही शेतकऱ्यांनी कोबी व टमाटा पिकाची लागवड केली. कोबी पिकावर करपा, पाकोळी, तुडतुडे आदि रोगांनी आक्रमण केल्याने हातातोंडाशी आलेला घास गेला. सततचा कमकुवत होत चाललेला पावसाळा बळीराजाला दिवसेंदिवस गरीबच बनवत चालला आहे.परिसरातन डाळींबबागांवर तेल्या रोगाने आक्रमण केल्याने डाळिंबबागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. महागडी फवारणी करूनही डाळिंबाची रोगराई थांबत नसल्याने शेतकरी बागा उपटून टाकत आहेत. साततच्या दुष्काळाची झळ सोसणारा बळीराजाला या वर्षीतरी तरी खरिपाच्या पिकांची साथ मिळेल का याबाबत शंका वाटत आहे. (वार्ताहर)