भीषण अपघात! ट्रक अन् बसची समोरासमोर धडक, 4 ठार 25 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 15:13 IST2018-09-04T14:13:53+5:302018-09-04T15:13:56+5:30

नंदूरबारहून एमएच 20 बीएल 2310 ही बस नाशिककडे निघाली होती. त्यावेळी समोरुन येणाऱ्या म्हणजेच नाशिकहून नंदूरबारकडे

Fatal accidents! The truck and the bus were hit in front of each other, and 5 others injured | भीषण अपघात! ट्रक अन् बसची समोरासमोर धडक, 4 ठार 25 जखमी

भीषण अपघात! ट्रक अन् बसची समोरासमोर धडक, 4 ठार 25 जखमी

देवळा (नाशिक) - तालुक्यातील भाबडबारीत येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

नंदूरबारहून एमएच 20 बीएल 2310 ही बस नाशिककडे निघाली होती. त्यावेळी समोरुन येणाऱ्या म्हणजेच नाशिकहून नंदूरबारकडे जाणाऱ्या पीएन 52 जेजे 053 या ट्रकला ही बस धडकली. या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. देवळा तालुक्यातील विंचूर शहादा प्रकाशा महामार्ग बावडेफाटाजवळ हा अपघात घडला आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून मृतांची ओळख पटविण्यचे काम सुरु आहे. सध्या, अपघातातील दोन जखमींची ओळख पटली आहे. दीपक कुलकर्णी रा अकोला (जि.नगर) आणि राहुल देवरे (सटाणा,जि.नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. 
 

Web Title: Fatal accidents! The truck and the bus were hit in front of each other, and 5 others injured