शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

सीमेंटचा रॅक उतरविण्यास शेतकऱ्यांचा विरोध

By admin | Updated: March 29, 2017 01:04 IST

कसबे सुकेणे : खेरवाडी येथील मालधक्क्यावर सीमेंटचा रॅक उतरविण्यास ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विरोध करत तब्बल तीन तास रास्ता रोको केला.

कसबे सुकेणे : खेरवाडी येथील मालधक्क्यावर सीमेंटचा रॅक उतरविण्यास ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विरोध करत तब्बल तीन तास रास्ता रोको केला. रॅक न उतरविण्याची रेल्वे प्रशासन व व्यापाऱ्यांकडून हमी मिळाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको मागे घेतला. मध्य रेल्वेच्या नाशिकरोड ते कसबे सुकेणे स्थानकादरम्यान खेरवाडी येथे मालधक्का आहे. जिल्ह्यातील कांदा व इतर मालांची येथे चढ-उतार होते. सीमेंटच्या धुळीमुळे या भागातील शेती व मानवी आरोग्य प्रभावित झाल्याने मालधक्क्यावर सीमेंटचा रॅक उतरविण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. तसा या गावाने ठराव करून व्यापाऱ्यांकडून लेखी हमी घेतली असल्याचे समजते. परंतु सकाळी ८ वाजेच्या सुमारास सीमेंटचा रॅक मालधक्क्यावर लागला असल्याचे शेतकऱ्यांना समजताच खेरवाडी येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. हा रॅक कुठल्याही परिस्थितीत उतरविला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. पंचायत समिती सदस्य रत्ना संगमनेरे, अनिल संगमनेरे, सुभाष आवारे, दशरथ संगमनेरे, विजय नागरे, अ‍ॅड. जीवन संगमनेरे, रमेश संगमनेरे आदिंनी रॅक उतरविण्यास विरोध असताना परिसरातील नागरिकांशी व शेतीशी व्यापारी वर्ग का खेळ करतात, असा सवाल करत रस्त्यावर ठाण मांडले. काही वेळातच आमदार अनिल कदम, कसबे सुकेणे गटाचे जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदार कदम यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करु न ठेकेदार व प्रशासनाकडून सीमेंट रॅक न उतरवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तणाव निवळला. (वार्ताहर)