शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

By admin | Updated: September 30, 2016 01:35 IST

समृद्धी महामार्ग : इंचभरही जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

 पांढुर्ली : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिवडे, आगासखिंड व सोनांबे येथे समृद्धी महामार्गाबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी या मार्गाला तीव्र विरोध करीत, एक इंचही जमीन देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. शिवडे येथे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता चिंतामण धोत्रे, तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांनी शेतकऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. शिवडे येथील मारुती मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी समृद्धी महामार्गाच्या लॅण्ड पुलिंग योजनेची माहिती देण्यास प्रारंभ केल्यानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी त्यास तीव्र विरोध केला. आम्हाला जमिनीच द्यायच्या नाहीत, त्यामुळे तुम्ही त्याचे फायदे आम्हाला सांगू नका, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. आमच्या जमिनी बागायती आहेत. पिढ्यान्पिढ्यांपासून आमची उपजीविका या शेतीवर सुरू आहे. या महामार्गामुळे आम्ही भूमिहीन होऊ, अशी भीती अनेक शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. शासनाने सदर महामार्ग रद्द करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी यावेळी केली. यापुढे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना समजावण्यासाठी बैठक घेऊ नये, असेही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. आम्हाला कितीही मोबदला दिला तरी आम्ही जमीन देणार नसल्याचे शेतकरी म्हणाले. शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्यानंतर अधिकाऱ्यांना बैठक आटोपती घ्यावी लागली. शिवडे येथील बैठकीस ज्ञानेश्वर चव्हाणके, अनिल शेळके, शांताराम ढोकणे, कारभारी हारक, भास्कर हारक, रावसाहेब हारक, अरुण हारक, पंडित वाघ, बहिरू वाघ, सुनील चव्हाणके, हरिभाऊ शेळके, लक्ष्मण वाघ, भास्कर वाघ, विलास हारक, तुकाराम हारक, निवृत्ती हारक, रोहिदास वाघ, चंद्रकांत वाघ, कैलास कातकाडे, सुभाष हारक, सुभाष शेळके, रघुनाथ शेळके, राजेंद्र केदार, दत्तू वाजे, तर आगासखिंड येथील बैठकीस नामदेव आरोटे, संजय गोडसे, परशराम गोडसे, अर्जुन तुपे, रावसाहेब बरकले, बळवंत आरोटे, रंगनाथ आरोटे, शांताराम आरोटे, निवृत्ती जाधव, सुभाष सोनवणे, कैलास जाधव, विष्णू बरकले, गेणू जाधव, रतन जाधव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)