शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या खरीपाच्या नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 15:15 IST

२०१८ मध्ये सुरूवातीला आगमन झालेल्या मान्सूनने नंतरच्या काळात पाठ फिरविली. परिणामी शेतकºयांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या, ज्या वेळी शेतीपिकांना पाण्याची गरज होती, त्यावेळी पाऊस न पडल्यामुळे शेतीपिक वाया गेले. संपुर्ण हंगामात नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या अवघे ८२ टक्केच पाऊस पडला.

ठळक मुद्देदुसरे वर्ष उजाडले : जिल्ह्यातील ३०८ गावे प्रतिक्षेतराज्यातील २६८ मंडळांमध्ये ८ नोव्हेंबर २०१८ रोजी दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला असला तरी, वर्ष उलटूनही दुष्काळग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. नाशिकसह राज्यातील सुमारे २६८ मंडळांमध्ये शासनाची गेल्या वर्षाची घोषित मदत पोहोचलेली नसून, त्यातच यंदा अवकाळी पावसामुळे नुकसानीची भर पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

२०१८ मध्ये सुरूवातीला आगमन झालेल्या मान्सूनने नंतरच्या काळात पाठ फिरविली. परिणामी शेतकºयांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या, ज्या वेळी शेतीपिकांना पाण्याची गरज होती, त्यावेळी पाऊस न पडल्यामुळे शेतीपिक वाया गेले. संपुर्ण हंगामात नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या अवघे ८२ टक्केच पाऊस पडला. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य सरकारने दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर करून पिक पंचनामे केले. त्यासाठी मात्र तालुक्याचा एकूण पाऊस हा निकष ग्राह्य धरल्याने अनेक गावातील शेतक-यांच्या पिक पंचनामे होवू शकले नाहीत. शेतक-यांच्या होणा-या तकारींची दखल घेत शासनाने उशिराने का होईना दुष्काळी परिस्थितीला सामोरे गेलेल्या शेतक-यांचेही पीक पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यातील २६८ मंडळांमध्ये राज्य सरकारने ८ नोव्हेंबर २०१८ रोजी दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर केली. त्यात नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड, कळवण, दिंडोरी तालुक्यांमधील १७ महसुली मंडळांचा समावेश करण्यात आलेला होता. त्यामध्ये येवला तालुक्यातील नगरसूल,अंदरसूल,पाटोदा,सावरगाव व जळगाव नेवूर तर निफाड तालुक्यातील देवगाव,नांदूरमध्यमेश्वर, रानवड, चांदोरी,सायखेडा या सहा मंडळात दुष्काळ जाहीर केलेला होता. कळवण तालुक्यातील कळवण,नवी बेज,मोकभणगी तर दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी,मोहाडी आणि वरखेडा या मंडळांचा समावेश होता. जिह्यातील एकूण १७ महसुली मंडळांमधील दुष्काळाने पिडीत ३०८ गावांचा यामध्ये समावेश आहे. एकट्या येवला तालुक्यातील ५ महसुल मंडळामधील ६०,९९९ बाधीत शेतकरी रुपये ५५ कोटी ९७ लक्ष ३५ हजार ८६४ रक्कम मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या संदर्भात राष्टÑवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना पत्र पाठवून शेतकºयांना मदत करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक