शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गिरणारे, गोवर्धन गटात गोेंधळ

By admin | Updated: February 22, 2017 01:59 IST

मतदार याद्यात घोळ : नागलवाडीचे मतदान गिरणारेत

नाशिक : तालुक्यातील चार गट व आठ गणांसाठी मंगळवारी (दि.२१) सकाळपासूनच मतदारांनी उत्साह दाखविला. दुपारी साडेतीनपर्यंत तालुक्यातील १३० मतदान केंद्रांवर एकूण एक लाख २९ हजार ४२७ मतदानापैकी ५४ हजार ४३२ मतदारांनी (४२.०६) मतदानाचा हक्क बजावला.  गिरणारे गटातील देवरगाव गणातील नागलवाडी या गावचे मतदान चक्क गिरणारे गणात समाविष्ट करण्यात आल्याने अनेक मतदारांचा गोंधळ उडाल्याचा आरोप माजी सभापती दिलीप थेटे यांनी केला, तर गोवर्धन गटातील गणेशगाव (त्र्यं) मधील सुमारे सातशेहून अधिक मतदारांची नावे गायब झाल्याचा आरोप गावातील मतदारांनी केला. सकाळी साडेसात वाजेपासूनच मतदानासाठी ग्रामीण भागात उत्साह होता.  चांदशी गावातील १४२८ मतदारांपैकी २४४ मतदान सकाळी ११ वाजेपर्यंत झाले होते. दुगाव येथील २,१९९ मतदानापैकी ४०७ मतदारांनी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत २० टक्के मतदारांनी हक्क बजावला होता. गिरणारे गाव हे गिरणारे गटातील मोठ्या मतदारसंख्येचे गाव असून, दुपारी बारा वाजेपर्यंत ५५१६ एकूण मतदानापैकी ७३९ मतदान झाले होते.  दुपारपर्यंत धोंडेगावला १३२३ पैकी ३७२, राजेवाडीला ५८५ पैकी २८०, गणेशगावला ७५० पैकी ४०० मतदान झाले. या गावातील कैलास कोरडे, पद्मा कोरडे, बाळू नामोडे, दिनकर कोरडे, विष्णु घोटे, सुखा नामोडे, मंदाबाई कोरडे, राजू कोरडे, विठ्ठल नामोडे, हौशाबाई नामोडे, महादू नामोडे, बाबूराव कोरडे, अनुसया कोरडे, शेवतांबाई कोरडे यांच्यासह शेकडो मतदारांची नावेच मतदार यादीतून गायब झाल्याने त्यांनी मतदान केंद्रांवर जाऊन शोधाशोध करूनही त्यांच्या पदरी शेवटी निराशा पडली.  महिरावणी येथे २,१२७ मतदारांपैकी ९२३ मतदान झाले होते. गावातील भाऊसाहेब खांडबहाले, शंकर खांडबहाले यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी मतदान केंद्रांबाहेर ठाण मांडल्याचे चित्र होते. तळेगावला १,५४९ पैकी ८६७, तर विल्होळीला २,०७० पैकी ९५५ मतदान दुपारी ३ वाजेपर्यंत झाले होते. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मतदार यादीत घोळ झाल्याचा मतदारांचा आरोप होता. (प्रतिनिधी)