शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

ठेकेदार पकडल्याच्या चर्चेने महापालिकेत पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 1:02 AM

महापालिकेच्या मुख्यालयात एका ठेकेदारास पकडल्याची एकच चर्चा पसरली आणि त्यानंतर गोंधळ उडाला. महापालिकेत कोणत्याही अभ्यागताला दरवाजे बंद करून दुपारी तीन वाजेनंतरच या असे सुरक्षारक्षकांनी सांगितल्यानंतर आणखीन गोंधळ झाला.

नाशिक : महापालिकेच्या मुख्यालयात एका ठेकेदारास पकडल्याची एकच चर्चा पसरली आणि त्यानंतर गोंधळ उडाला. महापालिकेत कोणत्याही अभ्यागताला दरवाजे बंद करून दुपारी तीन वाजेनंतरच या असे सुरक्षारक्षकांनी सांगितल्यानंतर आणखीन गोंधळ झाला. महापालिकेत एसीबीचा सापळा रचल्याची आणि ठेकेदाराला पकडल्याची चर्चा पसरली, परंतु नंतर ठेकेदाराला एसीबीने नव्हे तर आयुक्तांनी वेळेपूर्वी मुख्यालयात आल्याने पकडले, असा खुलासा झाला आणि वातावरण शांत झाले.बुधवारी (दि.२८) हा प्रकार घडला. राजीव गांधी भवनात अभ्यागतांना प्रवेश दुपारी तीन वाजेनंतरच असतो. सकाळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शांततेत काम करता यावे यासाठी ही व्यवस्था असली तरी त्याचे उल्लंघनदेखील केले जाते. विशेषत: ठेकेदार सकाळपासून केव्हाही महापालिकेत येतात. नागरिकांना मात्र नियमाच्या पालनाला सामोरे जावे लागते. बुधवारी (दि.२८) आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे महापालिकेत आगमन झाले आणि ते कार्यालयात जात असताना मोबाइल फोनचा आवाज आल्याने आयुक्तांना शंका आली त्यांनी संबंधिताला विचारले असता त्याने ठेकेदार असल्याचे सांगितल्याने आयुक्तांनी वेळेपूर्वी ठेकेदारांना मध्ये कसे काय सोडतात, असा प्रश्न करून सुरक्षारक्षकांना जाब विचारला. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी साऱ्यांचीच विचारपूस सुरू केली. तथापि, ठेकेदाराला पकडले, अशी चर्चा पसरल्याने गोंधळ उडाला.अधिकारीच बोलावतात ठेकेदारांनामहापालिकेच्या वतीने अभ्यागतांना प्रवेशासाठी तीन वाजेनंतरचीच वेळ आहे. त्यामुळे प्रवेशव्दारावर सुरक्षा कर्मचारी त्यांना अडवतात. मात्र, दुसरीकडे अधिकारीच ठेकेदारांना बोलावतात आणि सुरक्षा कर्मचाºयांना त्यांना मुख्यालयात सोडणे भाग पाडते, अशी वेगळीच कैफियत सुरक्षारक्षकांनी मांडली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग