पीक कर्ज परतफेडीस मुदतवाढ

By Admin | Updated: August 5, 2014 02:02 IST2014-08-05T01:10:19+5:302014-08-05T02:02:22+5:30

पीक कर्ज परतफेडीस मुदतवाढ

Extension of crop loan repayment | पीक कर्ज परतफेडीस मुदतवाढ

पीक कर्ज परतफेडीस मुदतवाढ


नाशिक : ३० जूनअखेर वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाच्या व्याजामध्ये प्रोत्साहनपर सवलत देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून लाभ देण्यात येत होता. या योजनेचा फायदा घेण्यासाठी ३० जून २०१४ ही अंतिम मुदत देण्यात आली होती; मात्र आता ही मुदत ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
यासंदर्भात १ आॅगस्ट २०१४ रोजी सहकार व पणन विभागाने निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुषंगाने आता राज्यातील जे शेतकरी पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कर्ज सवलत योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. राज्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या वसुलीस ३१ डिसेंबर २०१४ मुदतवाढ देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ३० जून २०१४ अखेर राज्यातील पीक कर्जाच्या वसुलीचे कमी प्रमाण विचारात घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने सन २०१३-१४ या वर्षात वाटप केलेल्या पीक कर्जाच्या परतफेडीस ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत १ आॅगस्ट २०१४ ला शासनाने तसा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांची वसुली थेट दिवाळीनंतरच होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
विकलेला माल परत
न घेणे बेकायदेशीर
मुंबई : विकलेली वस्तू सदोष किंवा कमी प्रतीची असली तरी दुकानदाराने ती परत न घेणे किंवा बदलूनही न देणे बेकायदा आहे, असा निकाल महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.- वृत्त :पान ९

Web Title: Extension of crop loan repayment