शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकाळ वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: August 1, 2014 01:09 IST

कार्यकाळ वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक : न्यायालयाने फटकारल्याने दिलेली मुदतवाढ मागे घेत राज्य शासनाने राज्यभरातील नगरपालिका व नगर परिषदांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुका वेळेत घेतल्याने येत्या २१ सप्टेंबरला संपत असलेला कार्यकाळ किमान तीन महिने वाढवून मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.रविवारी (दि. ३) राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आढावा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत प्रदेश अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे व प्रभारी मोहन प्रकाश हेही नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीची वेळ साधून जिल्हा परिषदेचे काही पदाधिकारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून पदाधिकाऱ्यांचा संपत असलेला २१ सप्टेंबरचा कार्यकाळ किमान तीन महिने वाढवून देण्याबाबत मागणी करणार असल्याचे समजते. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेला सामोरे जाताना मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेला ओळखले जाते. त्याचाच फायदा घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विद्यमान पदाचा लाभ होणार असल्याचे हे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार असल्याचे कळते. जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत पदाधिकारी निवड होणार की नाही, याबाबत रोजच चर्चा झडत आहेत. (प्रतिनिधी)