शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महिंद्रा युनियनच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ

By admin | Updated: July 17, 2017 00:16 IST

सातपूर : प्रलंबित वेतन वाढीचा करार पूर्ण करावा यासाठी महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनीतील कामगारांनी बहुमताने विद्यमान युनियन पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत संमत केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : प्रलंबित वेतन वाढीचा करार पूर्ण करावा यासाठी महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनीतील कामगारांनी बहुमताने विद्यमान युनियन पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत संमत केला आहे.  येथील महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र एम्प्लॉईज युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा दादासाहेब गायकवाड सभागृहात अध्यक्ष योगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सरचिटणीस सोपान शहाणे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सेक्रेटरी परशुराम कानकेकर, सहसचिव लॉरेन भंडारे, कमिटी मेंबर सुनील औसरकर, भुवनेश्वर पोई, खजिनदार ज्ञानेश्वर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. वर्षभराच्या कामकाजाचा आढावा खजिनदार पाटील यांनी मांडला. सद्यस्थितीत व्यवस्थापनाबरोबर युनियनची वेतन वाढीच्या करारावर बोलणी सुरू आहे. विद्यमान युनियन पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १७ जुलैला संपत आहे. पुढील बोलणीसाठी विद्यमान युनियनला मुदतवाढ देण्यात यावी, असा ठराव अध्यक्ष योगेश चव्हाण यांनी मांडला. या ठरावावर चर्चा करण्यात आली. हा चर्चेत माजी अध्यक्ष शिरीष भावसार, धवल चव्हाण, एन.डी. जाधव, अनिल गोजरे, राजू मोरे आदींसह काही सभासदांनी या मुदतवाढीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. तर संजय सोनवणे, रवि संसारे, सुभाष मोरे, सुनील सारस्वत, विनायक भावसार, थोरात आदींसह असंख्य सभासदांनी ठरावाच्या बाजूने ठाम मत व्यक्त केले आणि ठरावाला पाठिंबा दिला. त्यामुळे ठराव बहुमताने संमत करण्यात आला. या सभेत सुमारे दोन हजार सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन परशुराम कानकेकर यांनी केले. सरचिटणीस सोपान शहाणे यांनी आभार मानले विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत १७ जुलैला संपुष्टात येणार होती. परंतु आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वेतनवाढीच्या करारासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वेतनवाढीचा करार पूर्ण होईपर्यंत विद्यमान पदाधिकारीच कामकाज करणार आहेत. वेतनवाढीचा करार चांगला झाला तर पुढील तीन वर्षांसाठी हेच विद्यमान पदाधिकारी कायम राहू शकतात, असेही कामगारांचे म्हणणे आहे.