कार्यकारी अभियंता गणेश मेहेरखांब निवृत्त

By Admin | Updated: June 30, 2015 23:49 IST2015-06-30T23:48:56+5:302015-06-30T23:49:22+5:30

कार्यकारी अभियंता गणेश मेहेरखांब निवृत्त

Executive Engineer Ganesh Mehekhkab retired | कार्यकारी अभियंता गणेश मेहेरखांब निवृत्त

कार्यकारी अभियंता गणेश मेहेरखांब निवृत्त

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्रदीर्घ सेवेतून काल (दि.३०) लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश मेहेरखांब सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवत्तीनिमित्त निरोप समारंभात मेहेरखांब यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात या निरोप समारंभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर आदि उपस्थित होते. कार्यक्रमात कार्यकारी अभियंता गणेश मेहेरखांब यांचा उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन, तर अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या हस्ते मेहेरखांब यांच्या पत्नीला साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे, शैलेश सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता अनिल अहिरे, संजय सोनवणे, राजेंद्र ढगे यांच्यासह जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Executive Engineer Ganesh Mehekhkab retired