मुक्तीभूमीवर स्वातंत्र्य दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:19 IST2021-08-18T04:19:15+5:302021-08-18T04:19:15+5:30

येवला : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारकात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी तथागत भगवान ...

In the excitement of Independence Day at Muktibhumi | मुक्तीभूमीवर स्वातंत्र्य दिन उत्साहात

मुक्तीभूमीवर स्वातंत्र्य दिन उत्साहात

येवला : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारकात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रारंभी तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीसमोर व्यवस्थापक तथा संशोधन अधिकारी पल्लवी पगारे यांच्या हस्ते पुष्पअर्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्रिसरण व पंचशीलही घेण्यात आले. पर्यवेक्षक सिद्धार्थ हिरे यांनी सुगंधी पूजा केली. न्यायालयाच्या आवारामध्ये असलेल्या तिरंगी ध्वजास सलामी देण्यात आली. सूत्रसंचालन पंचम साळवे यांनी केले.

कार्यक्रमास दादासाहेब निकम, युवराज पगारे, बाळू गायकवाड, भाऊसाहेब झाल्टे, भाऊसाहेब पठारे, सिद्धार्थ त्रिभुवन, महिंद्र गरुड, विलास पगारे, मंगेश साबळे, आकाश आहिरे, समाधान गरुड, महेंद्र हिरे, आतीश पठारे, अशोक केदारे, सागर साळवे, छाया साबळे, अनिता चंदनशिव, आदी कर्मचारी उपस्थित होते.

(१६ येवला मुक्ती)

160821\140316nsk_55_16082021_13.jpg

मुक्तीभुमीवर स्वातंत्र्य दिन उत्साहात

Web Title: In the excitement of Independence Day at Muktibhumi