पेपर फुटीच्या सावटाखाली परीक्षा

By Admin | Updated: March 11, 2015 00:30 IST2015-03-11T00:30:11+5:302015-03-11T00:30:13+5:30

दहावी परीक्षा : गणिताच्या पेपरला १७ कॉपी प्रकरणे

Examination under the bay of paper separation | पेपर फुटीच्या सावटाखाली परीक्षा

पेपर फुटीच्या सावटाखाली परीक्षा

नाशिक : दहावीचा गणिताचा पेपर व्हॉट््स अ‍ॅपवर फुटल्याची अफवा सोमवारपासून पसरल्याने काहीशा संभ्रमाच्या वातावरणातच दहावीची परीक्षा पार पडली. पेपर फुटीची केवळ अफवाच असून, प्रश्नपत्रिकेत ऐनवेळी कोणताही बदल करण्यात आला नसल्याचा दावा नाशिक विभागीय मंडळाने केला आहे.
राज्य मंडळाच्या वतीने दहावी परीक्षेचा आज बीजगणित विषयाचा पेपर घेण्यात आला. मात्र तत्पूर्वी दोन दिवसांपासून व्हॉट््स अ‍ॅपवर पेपर फुटल्याची चर्चा पसरल्याने अनेक विद्यार्थी तणावात होते. काही अतिउत्साही विद्यार्थ्यांनी असा पेपर कुणाच्या व्हॉट््स अ‍ॅपवर मिळतो का याचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला. एकदा अफवा पसरली म्हटल्यावर या अफवांना अनेक पंखही फुटल्याने दोन दिवसांपासून याच विषयाची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होती. मात्र, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा नाशिक विभागीय मंडळाने केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Examination under the bay of paper separation