अंशकालीन निदेशक पदभरतीसाठी रविवारी परीक्षा

By Admin | Updated: December 18, 2014 23:00 IST2014-12-18T23:00:16+5:302014-12-18T23:00:26+5:30

अंशकालीन निदेशक पदभरतीसाठी रविवारी परीक्षा

Exam on Sunday for recruitment of part-time director | अंशकालीन निदेशक पदभरतीसाठी रविवारी परीक्षा

अंशकालीन निदेशक पदभरतीसाठी रविवारी परीक्षा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत अंशकालीन निदेशक पद भरती संदर्भात लेखीपरीक्षा येत्या रविवारी (दि.२१) होत असून, त्यासाठी पात्र उमेदवारांना प्रवेशपत्रे पोेस्टाने पाठविण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी दिली.
रविवारी सकाळी ११ ते दुपारी साडेबारा या वेळेत ही परीक्षा होणार आहे. २१ डिसेंबर २०१४ रोजी मराठा हायस्कूल येथे भाग एक व के.टी.एच.एम. महाविद्यालयात भाग दोन येथे या लेखीपरीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पात्र उमेदवारांना पोस्टाने या परीक्षेची आवदेनपत्रे पाठविण्यात आली आहेत. ज्यांना परीक्षा प्रवेशपत्रे मिळाली नसतील त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी केले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Exam on Sunday for recruitment of part-time director