प्रत्येक कार्यकर्ता हा पोलीसच : विश्वास नांगरे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:08 AM2019-08-29T01:08:20+5:302019-08-29T01:08:41+5:30

विघ्नहर्ता गणरायाचा मोठा उत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवात कोठेही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे,

 Every activist is a policeman: Biswas Nangare Patil | प्रत्येक कार्यकर्ता हा पोलीसच : विश्वास नांगरे पाटील

प्रत्येक कार्यकर्ता हा पोलीसच : विश्वास नांगरे पाटील

googlenewsNext

नाशिक : विघ्नहर्ता गणरायाचा मोठा उत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवात कोठेही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात आहे, मात्र शहरातील प्रत्येक लहान-मोठ्या मंडळांचा कार्यकर्ता साध्या वेशातील पोलीस आहे, हे विसरू नये, असे मत विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित शहराच्या शांतता समितीत व्यक्त केले.
आगामी गणेशोत्सव आणि मुहर्रम हे हिंदू-मुस्लीम बांधवांचे सण सोबत साजरे होत आहेत. शहरात कायदासुव्यवस्था टिकून रहावी, या उद्देशाने पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मुख्यालयातील भीष्मराज सभागृहात शहराच्या मध्यवर्ती शांतता समितीची बैठक बुधवारी (दि.२८) बोलाविण्यात आली. या बैठकीला महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, योगेश घोलप, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, भक्तिचरणदास महाराज, गणेश महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, सुहास फरांदे, माजी महापौर अशोक दिवे, अशोक मुर्तडक, उपआयुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी नांगरे पाटील यांनी उपस्थित मंडळांचे पदाधिकारी व शांतता समितीच्या सदस्यांकडून आलेल्या सूचनांची निश्चित दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. ज्या मंडळांना वाहतूक शाखेकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही त्यांनाही लवकरात लवकर परवानगी दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक मंडळाने त्याचे भान ठेवत या उत्सवाचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करावा आणि कायदासुव्यवस्थेचे पालन करत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करून सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत उत्साहात साजरा करावा. कुठलीही अडचण जाणवल्यास पदाधिकाऱ्यांनी थेट जवळच्या पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांशी अथवा सहायक आयुक्तांशी थेट संपर्क साधावा, असेही नांगरे पाटील म्हणाले.
यावेळी रामसिंग बावरी, गजानन शेलार, शंकरराव बर्वे, देवांग जानी, नगरसेवक सलीम शेख, वत्सला खैरे, आशा तडवी यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन
सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी केले.
गणेशोत्सवात  हेल्मेटसक्ती नको
गणेशोत्सवात हेल्मेटसक्तीचा नियम पूर्णपणे शिथिल करण्यात यावा, जेणेकरून नाशिककरांना गर्दीच्या काळात हेल्मेटचा त्रास जाणवणार नाही. हेल्मेटसक्तीच्या मोहिमेचे नाशिककरांनी स्वागतच केले आहे. गणेशोत्सवात तात्पुरत्या स्वरूपात हेल्मेटसक्तीला पूर्णविराम द्यावा, अशी मागणी यावेळी लोकप्रतिनिधी तसेच मान्यवर नागरिकांकडून करण्यात आली.

Web Title:  Every activist is a policeman: Biswas Nangare Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.