भगूर : विजयनगर भागात सकाळपासून जल्लोषपूर्ण वातावरणात लहान- मोठ्या ५० मित्रमंडळांनी सजावट मंडपात गणेशाची स्थापना केली. तसेच २०० कुटुंबांनी आपल्या घरात गणेशमूर्तीची स्थापना केली, तर काहींनी येथील मुख्य प्रभागातून जल्लोष मिरवणूक काढून गणरायाचे स्वागत केले. विजयनगर परिसरातील वीर सावरकर मित्रमंडळाने १०० कलाकारांचे वाजंत्री ढोल पथक आणले. त्यांनी तालभैरवाच्या ठेक्यावर नृत्य करत मिरवणूक काढून गणेश मूर्तीची स्थापना केली. दिवसभर शिवाजी चौक, मेनरोड, सुभाषरोड आदि रस्ते गणेशमूर्ती व पूजावस्तू खरेदीसाठी गर्दीने फुलून गेले होते. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}