शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

सेवेत सामावून घेण्यासाठी गटसचिवांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:34 IST

नाशिक : विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये गटसचिवपदी कार्यरत असलेल्या सचिवांना सरकारी सेवेत सामावून घेण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये गटसचिवपदी कार्यरत असलेल्या सचिवांना सरकारी सेवेत सामावून घेण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नाशिक जिल्हा सहकारी संस्था सेक्रेटरी व कर्मचारी युनियनच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, ग्रामीण विकासासाठी योगदान देणाऱ्या गटसचिवांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक सरकार दुर्लक्ष करीत आहेत. एकदिवसीय धरणे आंदोलनाला आयटकचे नेते राजू देसले यांच्यासह आमदार दीपिका चव्हाण यांनी पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनात संघटनेचे राज्य अध्यक्ष विश्वनाथ निकम, जिल्हाध्यक्ष देवीदास नाठे, उपाध्यक्ष राजीव गोसावी, राज्य प्रतिनिधी बाळासाहेब पवार, दीपक पवार, अमित थेटे, विलास पेखळे, विठोबा ढिकले यांच्यासह गटसचिव मोठ्या संख्येने सामील झाले होते. राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आल्याचे देवीदास नाठे यांनी सांगितले.विविध मागण्या च्गटसचिवांच्या सेवा सरकारमध्ये सामावून घ्याव्यात, गडाख समितीने दिलेल्या अहवालानुसार तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, २०१४ मध्ये शासनाच्या निर्णयानुसार गटसचिवांना १ टक्का अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ती तत्काळ करण्यात यावी, राज्य सरकारने ६० टक्के व सहकारी संस्थांनी ४० टक्के वेतन करावे, असा ६०/४० चा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचा निवेदनात समावेश होता.