शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात हुरडा पार्ट्यांना जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:16 IST

अनेक शेतकऱ्यांच्या वस्तीवर व फार्म हाउसवर सध्या मोठ्या प्रमाणात हुर्डा पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. थंडीच्या हुडहुडीत शेकोट्याचा आसरा घेत हुर्डा पार्ट्यांनी जोर धरला आहे. हुर्डा आणि भरीत यासह अन्य खमंग जेवणावळीचा अस्वाद घेणे लोक पसंत करीत आहे. शाकाहार हाच उत्तम आहार हे ब्रीद सध्या हुर्डा पार्टीत चर्चेचा विषय ठरत आहे.

येवला : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या वस्तीवर व फार्म हाउसवर सध्या मोठ्या प्रमाणात हुर्डा पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. थंडीच्या हुडहुडीत शेकोट्याचा आसरा घेत हुर्डा पार्ट्यांनी जोर धरला आहे. हुर्डा आणि भरीत यासह अन्य खमंग जेवणावळीचा अस्वाद घेणे लोक पसंत करीत आहे. शाकाहार हाच उत्तम आहार हे ब्रीद सध्या हुर्डा पार्टीत चर्चेचा विषय ठरत आहे.खेडोपाड्यात ज्वारीची भाकरी हेच लोकांचं प्रमुख अन्न असलं तरी आजकाल साखर वाढल्याने ज्वारी अधिक प्रिय वाटू लागली आहे. रब्बी हंगामातलं ज्वारीचे पीक जूनमध्ये लावलं जातं. थंडीच्या दिवसात साधारणपणे जानेवारीच्या सुमारास त्याची कणसं कोवळी आणि रसदार असतात. प्रत्यक्ष शेतात जाऊन, तिथेच कणसे काढून त्याची पार्टी करायची मजा काही औरच आहे. कणीस भाजून त्यातले हिरवेगार दाणे काढून ते बोचणाºया थंडीत खाण्यात मजा असते.हिवाळा चांगला सुरु झाला आहे. खेड्यावर हुरडा पार्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यातून एक प्रकारे निसर्ग पर्यटन होतं. आजकाल काही दुकानांत ज्वारीचे कोवळे दाणे अर्थात हुरडा मिळत असला तरी जी मजा शेतात आहे ती घरात नाही. हुरड्याबरोबर शेंगदाणा, तीळ, खोबरे आणि लसूण अशा चटण्याही बरोबर घेतल्या जात आहे.शेणाच्या गोवऱ्यांवर किंवा लाकडावर अथवा उसाच्याखोडव्यावर ज्वारीची कणसे भाजली जातात. पट्टीचे हुरडा खाणारेगरम कणीस थेट हातावर घेऊन, चोळून त्यातील चवदार दाणे बाहेर काढतात आणि त्याचा आस्वाद घेतानाचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.ज्वारीमध्ये अधिक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे कोठा साफ राहतो. पोट भरल्यासारखं वाटून भूक कमी लागते आणि आपोआप आहारावर नियंत्रण येते. वजन कमी होऊन कोलेस्टेरोल कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे. ज्वारीत मोठ्या प्रमाणावर लोहदेखील असतं. ज्वारीत कर्बोदके जास्त असल्यामुळे ते शक्तिवर्धक असतं.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfoodअन्न