नाशकात निवडणूक आचारसंहितेची ऐशी तैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 06:25 PM2019-09-22T18:25:15+5:302019-09-22T18:30:16+5:30

विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने नाशिक शहरातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील कोनशिला झाकण्यासह सत्ताधारी पक्षांचे छायाचित्र असलेल्या विविध सरकारी योजनांचे पलक लगोलग हटविले. मात्र शहरातील वेगवेगळ्या शासकीय इमारती आणि सार्वजनिक संस्थांच्या उद्घाटन आणि उपक्रमांच्या कोनशिला ‘जैसे थे’ आहे. ठिकठिकाणी विविध राजकीय पक्षांची चिन्हे आणि झेंडे अजूनही झळक त असल्याने आदर्श आचारसंहितेची ऐशी तैशी सुरू असून, प्रशासनाकडूनही आचारसंहितेच्या अंमलबजावणीला ढील दिली असल्याचे दिसून येत आहे.

The Election Code of Conduct in Nashik | नाशकात निवडणूक आचारसंहितेची ऐशी तैशी

नाशकात निवडणूक आचारसंहितेची ऐशी तैशी

Next
ठळक मुद्देनाशकातील शासकीय इमारतींच्या कोनशिला झाकण्याचा विसर शहरात झेंडे, पक्ष चिन्ह आणि नामफलकांतून आचार संहितेचे उल्लंघन

नाशिक : विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने शहरातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील कोनशिला झाकण्यासह सत्ताधारी पक्षांचे छायाचित्र असलेल्या विविध सरकारी योजनांचे पलक लगोलग हटविले. मात्र शहरातील वेगवेगळ्या शासकीय इमारती आणि सार्वजनिक संस्थांच्या उद्घाटन आणि उपक्रमांच्या कोनशिला ‘जैसे थे’ आहे. ठिकठिकाणी विविध राजकीय पक्षांची चिन्हे आणि झेंडे अजूनही झळक त असल्याने आदर्श आचारसंहितेची ऐशी तैशी सुरू असून, प्रशासनाकडूनही आचारसंहितेच्या अंमलबजावणीला ढील दिली असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी (दि.२१) दुपारपासून लागू झाल्यानंतर नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या  शासकीय जाहिराती आणि फलक हटविण्यास सुरुवात झाली होती. परंतु, निवडणूक विभागाने शहरातील दर्शनी भागाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी साधा दृष्टिक्षेपही टाकला नाही. त्यामुळे शहरातील विविध शासकीय विभागाच्या इमारतीवरील कोनशिला,  नगरसेवकाचे नामोल्लेख असलेल्या पाट्या, मुख्यमंत्र्यांचे चिन्ह असलेले झेंडे, विविध उपक्रम लोकार्पणाची कोनशिला, विविद पक्षांचे झेंडे व पक्षचिन्ह,संघटनांचे फलक असे अनेक ठिकाणी आचारसंहितेचे उल्लंघन होत असताना प्रशासनाने हे फलक काढण्याविषयी आणि संबंधित पक्ष संघटनांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्यात शनिवारी (दि.२१) विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याने शहरातील विविध राजकीय पक्षांचे फलक हटविण्यास सुरुवात झाली होती. पंरतु ही कारवाई मात्र केवळ देखाव्यापुरतीच ठरली असून, शहरातील विविध ठिकाणी अजूनही वेगवेगळ्या पक्ष व संघटनांचे चिन्ह असलेले फलक खुलेआम झळकत असल्याने आचारसंहितेचे नियम धाब्यावर बसविल्याचे दिसत आहेत.

आचारसंहितेचे उलंघन
निवडणुकीच्या तोंडावर भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेससारख्या राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर फलक लावले होते. राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नुकत्याच झालेल्या दौºयामुळे पक्षाचे झेंडे चौकाचौकांत लागले होते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेला समारोप सभेमुळे भाजप कार्यकर्त्यांची शहरात फलकबाजी केली होती. यातील दर्शनही भागातील फलक जमा प्रशासनाने काढले असले तरी अनेक ठिकाणच्या कोनशिला अद्यापही खुल्या असल्याने आचारसंहितेचे उलंघन होताना दिसून येत आहे.  

 

Web Title: The Election Code of Conduct in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.