धनादेश न वटल्याने कर्जदाराला शिक्षा

By Admin | Updated: September 11, 2016 00:57 IST2016-09-11T00:57:04+5:302016-09-11T00:57:11+5:30

धनादेश न वटल्याने कर्जदाराला शिक्षा

Education for the borrower without taking a check | धनादेश न वटल्याने कर्जदाराला शिक्षा

धनादेश न वटल्याने कर्जदाराला शिक्षा

सिन्नर : येथील रेणुकामाता नागरी सहकारी पतसंस्थेला कर्जापोटी दिलेला धनादेश न वटल्याने कर्जदारास एक महिना कैद व महिनाभरात १ लाख ४४ हजार
रुपये नुकसानभरपाईपोटी
भरण्याचे आदेश सिन्नर न्यायालयाने दिले.
रामनगरी भागात राहणारे अमोल यशवंत क्षत्रिय यांनी रेणुकामाता पतसंस्थेकडून कर्ज घेतले आहे. थकीत कर्जाच्या बदल्यात क्षत्रिय यांनी संस्थेला १ लाख ३१ हजार रुपयांचा स्टेट बॅँक आॅफ इंडियाचा
धनादेश दिला होता. खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने सदर धनादेश परत आला. संस्थेने क्षत्रिय यांना नोटीस पाठवून पंधरा दिवसात धनादेशाची रक्कम भरण्याची विनंती केली होती. मात्र क्षत्रिय यांनी कसूर
केल्याने संस्थेने त्यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला
होता.
न्यायालयाने क्षत्रिय यांना एक महिन्याची शिक्षा व १ लाख ४४ हजार ५३४ रुपये भरण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पतसंस्थेकडून देण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Education for the borrower without taking a check