नाशिक - भोंदू अशोक खरातप्रकरणी आता ईडीने एन्ट्री करत सोमवारी नाशिक, शिर्डी आणि पुण्यात एकूण १३ ठिकाणी छापेमारी केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी खरात याच्याशी निगडीत ट्रस्ट, त्याचा चार्टर्ड अकाउंटंट आणि त्याच्या काही नातेवाइकांशी निगडीत ठिकाणी ही छापेमारी केली. गेल्याच आठवड्यात ईडीने खरातच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता ही छापेमारी करण्यात आली आहे.
खरातच्या विरोधात नाशिक येथील एका बांधकाम व्यावसायिकाने पोलिसात खंडणीची तक्रार दाखल केली होती. खरातने २०१८ ते २०१९ या वर्षात या व्यावसायिकाकडून पाच कोटी रुपये खंडणीपोटी उकळले होते तसेच त्याचे आलिशान वाहनदेखील स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप करत ही तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांत नमूद या गुन्ह्याच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याखेरीज, खरात याने दोन पतसंस्थांमध्ये अनेक खाती उघडली होती आणि त्यात स्वतःचे नाव वारसदार म्हणून दिले होते आणि या खात्यांना त्याचा मोबाइल क्रमांक जोडला होता. त्याद्वारे या खात्यांतून तो व्यवहार करत असल्याची प्राथमिक माहिती ईडीच्या तपासात पुढे आली.
तृप्तबाला बंगल्याची आयकरकडूनही झडती नाशिकमधील खरातच्या गोविंदनगरातील ‘तृप्तबाला’ बंगल्यात ईडी तसेच आयकर विभागाच्या संंयुक्त पथकाने सोमवारी भल्या पहाटे छापा टाकला.दिवसभर चाललेल्या या छाप्यात खरातच्या मालमत्तांसंदर्भातील दस्तावेज तसेच त्याच्या मुख्य आर्थिक स्त्रोतांची काटेकोर तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चाकणकरांच्या बहिणीची तब्बल ८ तास चौकशीशिर्डी - ६० कोटींच्या संशयास्पद व्यवहारांबाबत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने सोमवारी समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत धडक दिली.शिर्डी पोलिसांनी या प्रकरणातील संशयित खातेदार प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची तब्बल आठ तास चौकशी केली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, कधीही समता पतसंस्थेत खाते उघडलेले नाही किंवा तेथे गेलेले नाहीत. दिलेला पत्ताही चुकीचा असल्याचे सांगितले.
Web Summary : ED and Income Tax raided Ashok Kharat's properties in Nashik, Shirdi, and Pune, investigating extortion and suspicious transactions. Raids targeted trusts, accountants, and relatives after a complaint of ₹5 crore extortion. Authorities also investigated bank accounts with Kharat as a nominee.
Web Summary : ईडी और आयकर विभाग ने नाशिक, शिरडी और पुणे में अशोक खरात की संपत्तियों पर छापा मारा, जिसमें जबरन वसूली और संदिग्ध लेनदेन की जांच की गई। 5 करोड़ रुपये की वसूली की शिकायत के बाद ट्रस्टों, एकाउंटेंट और रिश्तेदारों को लक्षित किया गया। खरात नामित बैंक खातों की भी जांच की।