शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

इको-फ्रेन्डली अंत्यसंस्कार : वृक्षतोडीवर मोक्षकाष्ठाचा उतारा ठरतोय प्रभावी पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 3:51 PM

नाशिक : अंत्येष्टीच्या पारंपरिक पद्धतीत लाकडांचा किलोने वापर केला जातो. यासाठी वृक्षतोड करावी लागत असल्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत ...

ठळक मुद्देवृक्षतोडीचे प्रमाणदेखील कमी होण्यास मदत मनपाकडे दोन वर्षांपासून पाठपुरावाठोकळे केवळ अडीचशे किलो इतकेच लागतात

नाशिक : अंत्येष्टीच्या पारंपरिक पद्धतीत लाकडांचा किलोने वापर केला जातो. यासाठी वृक्षतोड करावी लागत असल्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. यावर पर्याय म्हणून नागपूर महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेकडूनही पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा पर्याय विचारात घेतला जात आहे. दरम्यान, एका बेवारस मृतदेहावर अमरधाममध्ये पर्यावरणप्रेमींच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक पद्धतीने सोमवारी (दि.२४) अंत्यसंस्कार करण्यात आले.मागील वर्षापासून नाशिक शहरात इको-फ्रेण्डली लिव्हिंग फाउंडेशनच्या माध्यमातून शेतातील कचऱ्याच्या माध्यमातून तयार केलेल्या ठोकळ्यांचा (ब्रिकेट्स) वापर करून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयोग दोन वर्षांपासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. २०१८ साली दोन मृतदेहांवर तर मागील वर्षी एका मृतदेहावर अशाच पद्धतीने अंत्यसंस्कार करत शेकडो टन लाकूड वाचविण्यात यश आले. पर्यायाने वृक्षतोडीचे प्रमाणदेखील कमी होण्यास मदत होत आहे. एका मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी किमात तीनशे ते साडेतीनशे किलो इतके लाकूड लागते. त्याऐवजी शेतकचºयापासून बनवलेले ठोकळे केवळ अडीचशे किलो इतकेच लागतात. हे ठोकळे शेतीमधून निघणाºया कचºयापासून तयार केले जातात. या पर्यायाला अधिकाधिक प्राधान्य दिल्यास मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदेचे संवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे पर्यावरणप्रेमी आकांक्षा नाईक यांनी यावेळी सांगितले. अंत्यसंस्काराची पद्धत जुनीच आहे, मात्र या पद्धतीत इंधनाचा पर्याय नवा वापरला गेला आहे. हा पर्याय जर मनपाने उपलब्ध करून दिला तर मोठ्या प्रमाणात वृक्षराजीचे जतन करण्यास यश येईल, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.मनपाकडे दोन वर्षांपासून पाठपुरावादोन वर्षांपाून इको फ्रेन्डली लिव्हिंग फाउंडेशनसह स्थानिक पर्यावरणप्रेमींकडून महापालिका प्रशासनाकडे मोफत अंत्यसंस्कार योजनेअंतर्गत दहनासाठी शेतकच-यापासून तयार केलेल्या ठोकळ्यांच्या वापरास प्राधान्य द्यावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे; मात्र अद्याप यश आलेले नाही. मनपा प्रशासनाने उदासीनता दूर करून मोफत अंत्यसंस्कारासाठी लाकूड पुरवठ्याची नवीन निविदा काढताना तरी या पर्यायाचा विचार करायला हवा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी संस्थांकडून होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाenvironmentपर्यावरणDeathमृत्यूforestजंगल