शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

‘कसमादे’ परिसरात अर्ली द्राक्षांना बहर

By admin | Updated: July 24, 2014 01:04 IST

नवा प्रयोग : चारशे एकर क्षेत्रावर उत्पादन; ५00 कंटेनरची निर्यात

सटाणा : देशात नाशिकची ओळख द्राक्षपंढरी म्हणून आहे. मात्र याच जिल्ह्यातील खान्देशचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘कसमादे’ पट्ट्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी द्राक्षाचे लवकर उत्पादन घेण्यात वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे हा परिसर देशात द्राक्षांचे अर्ली उत्पादन घेण्यात एकमेव ठिकाण
ठरले आहे. या अर्ली द्राक्ष हंगामाच्या छाटण्या पूर्ण होत असल्या असून, सुमारे साडेतीनशे एकर क्षेत्रावरील द्राक्षबागा बहरू लागल्या आहेत.द्राक्षाचे शहर म्हणून नाशिक प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात निफाड, दिंडोरी, सिन्नर व चांदवड या तालुक्यांमध्ये द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. या भागातील द्राक्ष बहारासाठी आॅक्टोबर महिन्यात बागांची छाटणी सुरू होते. फेब्रुवारी महिन्यापासून द्राक्ष काढणीला येतात. मात्र बागलाण, मालेगाव, देवळा आणि कळवण या पट्ट्यातील भौगोलिक रचना आणि हवामान हे फळबागांसाठी अनुकूल आहे. याचाच फायदा घेत या भागातील प्रयोगशील शेतकरी नाशिकपेक्षा पाच महिने आधी म्हणजेच जून महिन्यात अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी छाटणी करतात. हा प्रयोग गेल्या चौदा वर्षांपासून शेतकरी यशस्वीपणे राबवत आहे. त्यामुळे हा पट्टा अर्ली द्राक्ष उत्पादन घेण्यात देशात एकमेव ठरला आहे. यंदा हंगामासाठी छाटणी प्रक्रिया संपली असून, कळ्या फुलून द्राक्षबागा बहरू लागल्या आहेत.
..असा असतो अर्ली हंगाम
द्राक्षांच्या विविध जातींचे वाण असून, या भागात सोनाका, थॉमसन, शरद, जम्बो, माणिकचमण, नानासाहेब, परपल, क्लोन-२, ताजगणेश या द्राक्ष जातीचे उत्पादन घेतले जाते. द्राक्षाच्या अर्ली बहार घेण्यासाठी १५ जून ते १५ जुलैदरम्यान बागांची छाटणी केली जाते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात द्राक्ष काढणीला येतात. हा अर्ली हंगाम १५ डिसेंबरपर्यंत सुरू असतो आणि एकरी १० ते ११ टन उत्पादन येते.
येथे घेतले जाते उत्पादन
कसमादे पट्ट्यातील सटाणा, चौगाव, कऱ्हे, ब्राह्मणगाव, किकवारी, डोंगरेज, विंचुरे, तळवाडे दिगर, दसाणे, केरसाने, मुंगसे, पिंगळवाडे, भुयाणे, करंजाड, निताणे, बिजोटे, लाडुद, जायखेडा, आनंदपूर, गोराणे, अंबासन, इजमाने, बिजोरसे, नामपूर, आसखेडा, वाघळे, जायखेडा, तांदुळवाडी, मालेगाव तालुक्यात दाभाडी, पिंपळगाव, आघार, यसगाव, देवळा तालुक्यातील देवळा, लोहोणेर, सटवाईवाडी, विठेवाडी, भऊर, खामखेडा, खर्डे तसेच कळवण तालुक्यातील कळवण, बेज, मानूर परिसरात अर्ली द्राक्षाचे सुमारे साडेतीनशे एकरवर उत्पादन घेतले जाते. (वार्ताहर)