दिंडोरी तालुक्यात ४३६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई-पीक नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 03:43 PM2020-08-02T15:43:51+5:302020-08-02T16:41:11+5:30

दिंडोरी : राज्यातील ई-पीक पाहणीचा पथदर्शी प्रकल्प दिंडोरी तालुक्यात राबविण्यात येत असून, जुलैअखेरपर्यंत ३६१९ शेतकऱ्यांच्या ४३६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई-पीक नोंदणी झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार यांनी दिली.

E-crop registration of crops on 4362 hectare area in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यात ४३६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई-पीक नोंदणी

दिंडोरी तालुक्यात ४३६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई-पीक नोंदणी

googlenewsNext
ठळक मुद्दे पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. ही नोंद तलाठीला आॅनलाइन दिसणार

दिंडोरी : राज्यातील ई-पीक पाहणीचा पथदर्शी प्रकल्प दिंडोरी तालुक्यात राबविण्यात येत असून, जुलैअखेरपर्यंत ३६१९ शेतकऱ्यांच्या ४३६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई-पीक नोंदणी झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार यांनी दिली.

नाशिक विभागातून दिंडोरी तालुक्याची ई-पीक पाहणी नोंदणीसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून निवड झालेली आहे. तालुक्यात हा प्रकल्प फेब्रुवारी २०१९ पासून राबवण्यात येत आहे. तालुक्यात एकूण ६७,०६४ पैकी ५६,४२६ खातेदारांची आतापर्यंत प्राथमिक नोंदणी झालेली आहे. तालुक्यातील सर्व तलाठी व कृषी सहायक तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण नुकतेच पार पडले. राज्यस्तरावरून या प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक व राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. जयंतकुमार बांठीया, संभाजी कडू पाटील, प्रकल्प सल्लागार रामदास जगताप, राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांनी मार्गदर्शन केले. दिंडोरी तालुक्याचे ई-पीक पाहणी कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी अधिकाºयांसमवेत आढावा बैठक पार पडली. दिंडोरी तालुक्यातील पोलीसपाटील, कोलवाल, कृषिमित्र, मोबाइलदूत, स्वस्त धान्य दुकानदार, ई-सेतु केंद्रधारक व शेतकरी गटांनाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोबाइल अ‍ॅपवर पीक-पाहणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. चालू वर्षाच्या खरीप हंगामातील पीक पाहणीला सुरुवात झाली असून, या वर्षीच्या खरीप हंगामातील संपूर्ण पीक पाहणी ही फक्त मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून केली जाणार असल्याने सर्व शेतकºयांनी आपल्या पिकांची नोंदणी स्वत: करणे आवश्यक आहे, असे कळविण्यात आले आहे.

ई-पीक नोंदणीप्रक्रि या
शेतकºयांनी मोबाइलवर ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे आपल्या पिकांची नोंदणी करावयाची असून, आपल्या पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. ही नोंद तलाठीला आॅनलाइन दिसणार असून, त्यांनी मान्यता देताच सातबारा उताºयावर आॅनलाइन नोंद होणार आहे.

ई-पीक नोंदणीचे फायदे
आॅनलाइन नोंदणीमुळे अचूक व गतीने माहिती संकलित होणार आहे. या माहितीचा उपयोग शासनाला कृषी धोरण आखताना होणार असून, पीककर्ज, पीकविमा कर्जमाफी, नैसर्गिक आपत्तीचे नियोजन, शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल खरेदी-विक्र ी करणे या कामकाजात सुलभता आणण्यास व तलाठी यांच्याकडील कामाचा बोजा कमी करण्यास मदत होणार आहे.

Web Title: E-crop registration of crops on 4362 hectare area in Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.