शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
3
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
4
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
5
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
6
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
7
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
8
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
9
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
10
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
11
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
12
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
13
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
14
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांनी बनविले टाकाऊतून टिकाऊ

By admin | Updated: September 5, 2014 00:32 IST

चिमुकल्यांनी बनविले टाकाऊतून टिकाऊ

सिन्नर : येथील संजीवनीनगर भागातील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी टाकाऊ वस्तूंपासून विविध आकर्षक टिकाऊ वस्तू बनविल्या. विद्यार्थ्यांच्या किमयागार हातातून आकारलेल्या वस्तू नजरेत भरणाऱ्या ठरल्या.शाळेतील कलाशिक्षक प्रीती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आकाराच्या गणेशमूर्तींसह बहुपयोगी वस्तू बनविण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवनिर्मितीचा आनंद ओसंडून वाहत होता. या कार्यशाळेत मुख्याध्यापक श्रीमती सुरेखा जेजूरकर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेल्या गणेशमूर्तीमुळे उद्भवणाऱ्या विविध समस्यांची माहिती सांगतानाच मानवी आरोग्यावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी इको-फ्रेंडली गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना जलप्रदूषण रोखण्याचे आवाहन केले. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविण्याच्या कार्यशाळेत सुमारे १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रारंभी रिकाम्या बिनकामाच्या पुठ्ठ्याच्या खोक्यांना विविध आकार देऊन वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू बनविण्याचे शिकविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी घरातील टाकून देण्यासारख्या वस्तूंपासून घरात शोभिवंत वस्तू बनवू शकतील हा या कार्यशाळेचा उद्देश होता. घरात अनेक टाकाऊ वस्तू अडगळीत फेकून दिलेल्या असतात. बिनकामाच्या वस्तूंना भौमित्तिक आकार देऊन शोभेसाठी कुंदन, चमकी, रंग यांचा वापर करून आकर्षक वस्तू बनविण्यात आल्या. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी पंकज शिंदे, अनिता चव्हाण, लक्ष्मण रेवगडे, मीनाक्षी बकरे, योगेश वैष्णव, शंकर बेणके, सविता सावंत, वैशाली गुरुळे आदिंसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)