शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट टळले!

By admin | Updated: July 15, 2017 01:18 IST

नाशिक : जूनच्या पावसावर विसंबून पेरणी केलेल्या, परंतु तीन आठवडे पाठ फिरविलेल्या पावसाच्या दमदार पुनरागमनाने जिल्ह्णावर कोसळलेले दुबार पेरणीचे संकट टळले

४० टक्के नोंद : पावसाने गतवर्षाची सरासरी गाठलीलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जूनच्या पावसावर विसंबून पेरणी केलेल्या, परंतु तीन आठवडे पाठ फिरविलेल्या पावसाच्या दमदार पुनरागमनाने जिल्ह्णावर कोसळलेले दुबार पेरणीचे संकट टळले असून, शुक्रवारी मध्यरात्रीपासून संततधार लावलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने जिल्ह्णात गत वर्षाप्रमाणे सरासरी ४० टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.  शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्णात ७५७ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असून, सर्वाधिक पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात करण्यात आली आहे. त्याखालोखाल त्र्यंबकेश्वर येथे १२५, सुरगाण्याला १११ व पेठला ८८ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नाशिक शहरातही ४८ मिलीमीटर पाऊस झाला. शुक्रवारच्या पावसाने जिल्ह्णातील नांदगाव वगळता सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हजेरी लावल्यामुळे पेरणीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, विशेष करून पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ, सुरगाणा, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांतील भाताची आवणी अडचणीत सापडली होती.  जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने त्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी भाताची आवणी केली, परंतु रोपे तयार झाल्यानंतर भात लावणीसाठी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली. अशीच परिस्थिती मका, सोयाबीन, बाजरीची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची झाली होती. जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला प्राधान्य दिले होते. पेरणीनंतर पाण्याची गरज असताना जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे पिके धोक्यात आली होती. त्यामुळे गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण जिल्ह्णातच पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्ह्णात जुलै महिन्यात पावसाची सरासरी ५६७१ मिलीमीटर इतकी असून, गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्णात २६४७ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. जून व जुलैचा एकूण पाऊस पाहता जिल्ह्णाच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्णात ४० टक्के इतका पाऊस झाला होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात कमी पाऊस झाल्यामुळे व्यक्त होणारी चिंता दूर झाली आहे.