शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी टमाटा लागवड धोक्यात

By admin | Updated: June 24, 2014 00:26 IST

रेडगाव खुर्द : पावसाअभावी टमाटा लागवड धोक्यात

रेडगाव खुर्द : काहीसे साठवून ठेवलेले पाणी व सिंचनाचा वापर करून आज ना उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी टमाटा लागवड केली. परंतु रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे जाऊन पावसाने अद्याप हजेरी लावली नसल्याने शेकडो एकरावरील टमाटा लागवड धोक्यात आली आहे.चांदवड तालुक्यात तुलनेने अधिक पाऊस होणाऱ्या व भक्कम पाटपाण्याची सुविधा असलेल्या काही गावांचा परिसर वगळता इतरत्र पाणीटंचाई आहे. कांदा लागवडीसह पुढील हंगामासाठी टमाट्याचा चांगला आधार मिळू शकतो. त्यातच मागणीपेक्षा कमी पुरवठ्याच्या काळातील चांगला भाव पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी लवकर लागवड करण्याचा प्रयत्न करतो. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आज ना उद्या पाऊस नक्की येईल, या दुर्दम्य आशेवर शेततळे व विहिरीत साठवून ठेवलेल्या पाण्याच्या आधारे सूक्ष्म सिंचनाचा वापर करून टमाटा लागवड केली.अनेकांनी तर विकत पाणी घऊन लागवड केली. परंतु पावसाने हवामानतज्ज्ञाचा पाच दिवस उशिरा मान्सून येणार हा हवाला खोटा ठरवत रोहिणी व मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले आहे.यादरम्यान अनेकांचे साठवून ठेवलेले पाणी संपले आहे. ज्यांच्याकडे थोडेफार शिल्लक आहे. ते दोनपाच मिनिटे सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देऊन टमाटा जगवण्याचा जीवापाड प्रयत्न करीत आहे. या दरम्यान, आधीच पाण्याची कमी त्यात वाढलेले तपमान, आजूबाजूची तापलेली जमीन, सोसाट्याचा वारा यामुळे लागवड केलेले टमाट्याची रोपे कोमेजत आहे. वाढ खुंटली आहे. तसेच पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावासह इतर रोगांना टमाट्याची लागवड बळी पडत आहे. एकूणच पावसाअभावी शेकडो एकरावरील टमाट्याची लागवड धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांचा खर्च व कष्ट वाया जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.