शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या माहितीमुळे योजनेपासून वंचित

By admin | Updated: April 9, 2015 00:36 IST

जननी सुरक्षा : पंचवटी रुग्णालयातील प्रकार

हनुमानवाडी : महाराष्ट्र शासनाच्या जननी सुरक्षा योजनेची माहिती व्यवस्थित व परिपूर्ण दिली जात नसल्याने पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल मातांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. जननी सुरक्षा योजनेची माहिती मातांना देण्यात यावी आणि त्यांना या योजनेत सामावून घ्यावे, असे शासनाचे आदेश आहेत. शासकीय प्रसूतिगृहामध्ये या योजनेची जाहिरात अग्रभागी लावावी, त्यातून त्या योजनेची सर्व माहिती देण्यात यावी, असेही नियम आहेत. परंतु पंचवटीतील इंदिरा गांधी प्रसूतिगृह रुग्णालयात अर्धवट माहिती देण्यात आल्यामुळे मातांना या योजनेपासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप येथील काही रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी काही कागदपत्रे लागतात त्याची माहिती लिहिण्यात आलेली आहे. परंतु आता रेशन कार्ड आणि आधार कार्डही आवश्यक असल्याने या कागदपत्रांचा मात्र उल्लेखच रुग्णालयांच्या माहिती फलकावर देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकांना इंदिरा गांधी रुग्णालय ते जिल्हा रुग्णालयात चकरा माराव्या लागत आहे. यासंदर्भात पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात विचारणा केली असता फलकावरील माहिती जुनी असल्याचे सांगण्यात आले. आधार कार्ड, रेशन कार्ड लागते किंवा नाही याची माहिती नसल्याचे उत्तर संबंधिताना देण्यात आले. त्यांच्या या भूमिकेमुळे मातांना मात्र योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. लागणाऱ्या कागदपत्रांच्या यादीत आधार आणि रेशन कार्ड लिहिलेला कागद चिकटविला तर प्रश्न मिटू शकेल; मात्र येथेही शासकीय कारभार आडवा येत असल्याचा अनुभव लाभार्थ्यांना येत आहे. (प्रतिनिधी)