जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरूच

By Admin | Updated: July 31, 2014 00:54 IST2014-07-30T23:26:56+5:302014-07-31T00:54:56+5:30

जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरूच

Due to heavy rain in the district | जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरूच

जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरूच

 नाशिक : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. इगतपुरी तालुक्यात पूरस्थिती कायम असून, दारणा नदी काठालगतच्या शेतांमध्ये पाणी घुसले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
गोदावरीला पूर... पुनर्वसू नक्षत्राच्या जोरदार आणि संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरीला पूर आला आहे. पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती. पावसामुळे गंगापूर धरणातील पाण्याची पातळी वाढली असून, तेथील पाणीसाठा ७० टक्क्यांवर आला आहे.

Web Title: Due to heavy rain in the district