शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष पंढरी संकटात, निर्यातक्षम मालाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:04 IST

जगभर द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर हवामान बदलामुळे विपरीत परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरात कडाक्याच्या थंडीनंतर गेल्या आठवड्यातील एक दोन दिवसाचे ढगाळ वातावरण आणि त्यानंतर अचानक तापमान घसरून ५अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून जिल्ह्यातील काही बागातील तपमान शून्य अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने द्राक्षमणी फुटण्याचा धोका वाढला आहे.सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे द्राक्षबागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यासोबतच निर्यातक्षम द्राक्षांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.

ठळक मुद्देथंडीमुळे द्राक्ष मणी तडकण्याचे प्रमाण वाढलेहवामान बदलामुळे द्राक्ष पंढरीवर संकटाचे ढग निर्यातक्षम द्राक्षांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताक्रांत

नाशिक : जगभर द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर हवामान बदलामुळे विपरीत परिणाम होत आहे. गेल्या महिनाभरात कडाक्याच्या थंडीनंतर गेल्या आठवड्यातील एक दोन दिवसाचे ढगाळ वातावरण आणि त्यानंतर अचानक तापमान घसरून ५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून जिल्ह्यातील काही बागातील तपमान शून्य अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने द्राक्षमणी फुटण्याचा धोका वाढला आहे.सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे द्राक्षबागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यासोबतच निर्यातक्षम द्राक्षांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला  आहे. संपूर्ण हंगामात विशेष काळजी घेऊन जोपासलेल्या द्राक्षबागा गेल्या महिन्यातील कडाक्याच्या थंडीमुळे साखरभरणी काही प्रमाणात लांबली असतानाच गेल्या दोन-तीन दिवसांत तापमानाचा पारा वधारत असताना तापमानात कमालीची घट झाली असून पारा घसरल्याने द्राक्षमणी तडकल्याने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच ज्या भागात तपमान ५ अंशाहून अधिक आहे, अशा परिसरातही थंडीमुळे द्राक्षांची साखरभरणी होण्याचा कालावधीही लांबला आहे. या परिस्थितीत वाढीला लागलेल्या द्राक्षबागांमधील मणी वाचविण्यासाठी शेतऱ्याकडून बागांमध्ये शेकोटी पेटवून ऊब निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. तसेच हवामान बदलामुळे द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करप्या या रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

अशा परिस्थितीत कृषी तज्ज्ञांकडून द्राक्षबागांच्या अंतिम टप्प्यात योग्य औषध व औषधाचे प्रमाण याविषयी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, औषध फवारणी करताना कमी कार्यक्षमतेपासून मध्यम कार्यक्षमतेची फवारणी यंत्रे व औषधे वापरण्यासोबतच फवारणीमुळे द्राक्षमण्यांवर फवारणीचे द्रावण ओघळून येणार नाही अथवा फवारणीवेळी सल्फरचे डाग पडणार नाही याची दक्षता घ्यावी, सल्फर वापरलेल्या बागेमध्ये जैविक नियंत्रण घटकांचा वापर शक्य तेव्हा करावा, असा सल्लाही कृषितज्ज्ञाकडून दिला जात आहे. त्यामुळे द्राक्षबागा संकटात असताना शेतकरी मात्र समस्येवर मार्ग काढण्याच्या विचारांनी चिंताक्रांत झाला आहे. द्राक्ष शेती मार्गदर्शकांच्या मतानुसार, द्राक्षबागांना हवामान बदलामुळे धोका संभवत असला तरी शेतकºयांनी अतिघातक औषधांचा अधिक वापर न करता तज्ज्ञांच्या सल्ल्याने बागांची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. तापमानाचा पारा घसरला असला तरी सर्व क्षेत्रात तापमान सारखेच असते, असे नाही. त्यामुळे विहीर आणि खोलगट भागालगत अगदी नीचांकी सहा ते पाच अंशांपर्यंत तापमान असलेल्या भागातच शेतकºयांनी शेकोटी पेटवून बागांना ऊब देणे आवश्यक आहे. 

निर्यात घटण्याची शक्यता गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्यातून सुमारे एक लाख दोन हजार ८१६ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. परंतु, यावर्षी थंडीच्या कडाख्याने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. एकीकडे द्राक्ष बागा संकटात असताना शेतºयांना मात्र बागा साखर भरणीच्या काळात असल्याने अति तीव्रतेच्या औषधांचा वापर करता येत दुसरीकडे द्राक्षमणी फू टल्याने बागांचे नूकसान होऊन हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.   

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकFarmerशेतकरीweatherहवामान