शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

‘वीट बंदी’मुळे कुंभार व्यावसायिकांची उपासमार

By admin | Updated: August 26, 2016 23:43 IST

नाराजी :केंद्र शासनाच्या निर्णयाला विरोध

 सातपूर : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचना जारी करून वीट उत्पादक कुंभार समाजावर अन्याय केला आहे. परंपरागत व्यवसाय नष्ट होणार असल्याने हा निर्णय मागे घेण्यात यावा, या मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना जिल्हा कुंभार समाज संघटनेच्या वतीने देण्यात आले.केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार मातीपासून लाल विटा तयार करणाऱ्या उत्पादकांना प्रतिबंध करण्यात आला आहे आणि कोळसा किंवा लिग्नाइटवर चालणाऱ्या औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेपासून बनविण्यात येणाऱ्या विटांचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. या निर्णयामुळे कुंभार समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे. छोटेखानी वीटभट्ट्या बंद पडणार आहेत. परंपरागत कुंभार काम व्यवसाय नष्ट करण्याचा शासनाचा डाव आहे. या निर्णयाने समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.नाशिक जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी विश्वनाथ अहेर, बाळासाहेब जोर्वेकर, सोमनाथ सोनवणे, सुभाष कुंभार, राजेंद्र रोकडे, बाळासाहेब शिरसाठ, सोपान सोनवणे, राजू गारे, माणिक रसाळ, अरविंद रोकडे, नंदकुमार सोनवणे, भगवान अहेर, आदि उपस्थित होते. (वार्ताहर)