भरधाव दुचाकी भिंतीवर आदळल्याने चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 16:00 IST2020-01-03T15:54:25+5:302020-01-03T16:00:16+5:30
सिडकोतील पाटीलनगर शाळेजवळील एका भिंतीला भरधाव वेगातील दुचाकी धडकल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात जखमी झालेले उत्तमनगर संकेत रो हाउस येथील नंदकुमार निरज अकिलेश ठाकूर (२६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव दुचाकी भिंतीवर आदळल्याने चालक ठार
नाशिक : सिडकोतील पाटीलनगर शाळेजवळील एका भिंतीला भरधाव वेगातील दुचाकी धडकल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात जखमी झालेले उत्तमनगर संकेत रो हाउस येथील नंदकुमार निरज अकिलेश ठाकूर (२६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील भाद्रपद सेक्टरमधील अनुष्का रो हाऊस येथील राहणार राहूल अरविंद पाठक हा एमएच १५ सीएन ८९०३ क्रमांकाच्या दुचाकीवर हेल्मेट परिधान न करात डबलसीट बसून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने जात असताना पाटीलनगर येथील शाळेजवळील भिंतवर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात राहूल पाठक याचा मृत्यू झाला असून फिर्यादी नंदकुमार ठाकून यांसा दुखापत झाली आहे. त्याचप्रमाणे दुचाकी वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे. शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघण केल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून केला जात असतानाच अशा प्रकारे बेदरकारपणे वाहन चालविण्याचे प्रकार सुरूच आहे. अशा प्रकारांमुळे वाहन चालकांसोबतच सामान्य नागरिकाचीही सुरक्षितता धोक्यात आली आहे.